Home ब्रेकिंग न्यूज US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्यातून बचावले नवे सर्वोच्च नेते; मोजतबा खामेनेईंबाबत इराणी नेत्याचा खळबळजनक दावा

US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्यातून बचावले नवे सर्वोच्च नेते; मोजतबा खामेनेईंबाबत इराणी नेत्याचा खळबळजनक दावा

0
US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्यातून बचावले नवे सर्वोच्च नेते; मोजतबा खामेनेईंबाबत इराणी नेत्याचा खळबळजनक दावा
Mojtaba Khamenei

तेहरान : अमेरिका आणि इस्रायलच्या भीषण हल्ल्यांदरम्यान इराणच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड झालेले अयातुल्ला मोजतबा खामेनेई हे अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयाच्या ढिगाऱ्याखालून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचा दावा इराणी नेते मोहसेन हैदरी यांनी कतारच्या वृत्तवाहिन्याला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. या भीषण हल्ल्यांमध्ये तेहरानमधील तब्बल तीन रुग्णालयांना लक्ष्य करण्यात आले होते. तिसऱ्या रुग्णालयात उपचार घेत असताना मोजतबा खामेनेई यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. अमेरिकेच्या गुप्तचर अहवालानुसार, या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली असून, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत जगभरात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.(US Iran Conflict)

https://www.prahaar.in/2026/09/27/major-blow-before-the-festive-season-will-electronic-goods-including-acs-and-tvs-become-costlier-price-hikes-likely/

विशेष म्हणजे, 8 मार्च रोजी गुप्त पद्धतीने पार पडलेल्या प्रक्रियेत त्यांची नव्या सर्वोच्च नेतेपदी निवड झाली. खुद्द मोजतबा खामेनेई यांनाही सरकारी टीव्हीवर घोषणा होईपर्यंत या निवडीची कल्पना नव्हती, असा गौप्यस्फोट हैदरी यांनी केला आहे. हा निवड सोहळा पार पडणाऱ्या ‘असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स’च्या कोम येथील सचिवालयावरही बॉम्बहल्ला झाला होता, ज्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आणि महत्त्वाची कागदपत्रे नष्ट झाली. मोजतबा खामेनेई यांच्याकडे याआधी कोणतेही औपचारिक राजकीय पद नव्हते, ते केवळ वडिलांचे मुख्य सल्लागार होते. त्यामुळे अनेकदा त्यांना ‘अंधारातील व्यक्ती’ म्हणून संबोधले जाते. मात्र, देशासमोरील युद्धजन्य परिस्थिती पाहता त्यांच्याशिवाय दुसरा सक्षम पर्याय नाही, असे समर्थन हैदरी यांनी केले आहे. सध्या मोजतबा खामेनेई यांची प्रकृती उत्तम असून त्यांच्याकडे देश चालवण्याची पूर्ण क्षमता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.(US Iran Conflict)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here