Home ब्रेकिंग न्यूज Bank Strike : बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा संप अखेर मागे; ग्राहकांना मोठा दिलासा

Bank Strike : बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा संप अखेर मागे; ग्राहकांना मोठा दिलासा

0
Bank Strike : बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा संप अखेर मागे; ग्राहकांना मोठा दिलासा

मुंबई : सोमवारपासून सुरू होणारा बँक कर्मचाऱ्यांचा प्रस्तावित 3 दिवसांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्यात रविवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सोमवारपासून बँकिंग सेवा बंद राहण्याची शक्यता टळली असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रविवारी रात्री सुमारे 9.30 वाजता IBA आणि UFBU यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी संबंधित विविध मागण्या तसेच काही प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या चर्चेनंतर काही मुद्द्यांवर सहमती झाल्याने प्रस्तावित आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

https://www.prahaar.in/2026/09/27/new-leader-survived-us-attack-iranian-leader-makes-sensational-claim-regarding-mojtaba-khamenei/

शनिवारी बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याच्या मागणीवरही बैठकीत चर्चा झाली. या विषयावर IBA आणि UFBU यांच्या उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. ही समिती बँक कर्मचारी, ग्राहक आणि बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार नाही, असा पर्याय शोधणार आहे. त्यानंतर या मुद्द्यावर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

याशिवाय स्केल IV आणि त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी असलेल्या PLI म्हणजेच Performance Linked Incentive योजनेबाबतही चर्चा झाली. कामगिरीच्या आधारावर मिळणाऱ्या या प्रोत्साहन योजनेबाबत बँक युनियनच्या काही आक्षेपांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये आवश्यक बदल करण्याबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली.

तसेच 8 मार्च 2024 रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृत्तातील इतर प्रलंबित मुद्द्यांवरही दोन्ही बाजूंमध्ये चर्चा करून तोडगा काढण्याचे ठरले आहे.

या चर्चेनंतर UFBU ने प्रस्तावित आंदोलन आणि संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 3 दिवसांचा बँक संप टळला आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर 27 सप्टेंबर रोजी रविवारची सुट्टी असूनही अनेक बँक कर्मचारी कामावर उपस्थित राहिले होते.