Home क्राईम Guwahati News : गुवाहाटीत 22 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू! प्रियकराने रचली आत्महत्येची कहाणी, पोलिसांकडून तपास सुरु

Guwahati News : गुवाहाटीत 22 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू! प्रियकराने रचली आत्महत्येची कहाणी, पोलिसांकडून तपास सुरु

0
Guwahati News : गुवाहाटीत 22 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू! प्रियकराने रचली आत्महत्येची कहाणी, पोलिसांकडून तपास सुरु
फोटो सौजन्य : ANI Image

गुवाहाटी : गुवाहाटी विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय निमिषा ठाकुरिया हिचा गुवाहाटीतील अझारा परिसरातील एका होमस्टेमध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिच्यासोबत असलेल्या असिफ अली याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिच्या मृत्यूची परिस्थिती आणि कारणाचा तपास सुरू आहे. (Guwahati News)

मिळालेल्या माहितीनुसार, निमिषा गारचुक-धारापूर परिसरातील Rudra’s Kitchen या होमस्टेमध्ये गेली होती. शनिवारी सकाळी ती तेथे बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

https://www.prahaar.in/2026/09/27/the-door-was-opened-and-screams-rang-out-young-womans-body-found-in-the-lodge/

या प्रकरणात ताब्यात असलेल्या असिफ अलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, निमिषाने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा केला आहे. मात्र, पोलिसांनी हा दावा अद्याप सत्य म्हणून स्वीकारलेला नाही. घटनेशी संबंधित सर्व शक्यता तपासण्यात येत असून, शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट केले जाणार आहे. (Guwahati News)

पोलिस निमिषाच्या हालचाली, होमस्टेमधील घटनाक्रम आणि असिफ अलीची भूमिका यांची चौकशी करत आहेत. होमस्टेतील नोंदी आणि संबंधित व्यक्तींचीही माहिती तपासली जात आहे. (Guwahati News)

https://www.prahaar.in/2026/09/27/gold-worth-%e2%82%b9475-crore-smuggled-via-courier-network-major-dri-crackdown-11-arrested/

दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक पातळीवर तणाव निर्माण झाला असून, नागरिकांनी रस्त्यावर आंदोलन केल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, निमिषाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही आणि पोलिसांचा तपास सुरू आहे. (Guwahati News)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here