Home ब्रेकिंग न्यूज Central Railway : मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक; सेवांमध्ये बदल

Central Railway : मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक; सेवांमध्ये बदल

0
Central Railway : मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक; सेवांमध्ये बदल
फोटो सौजन्य : ANI Image

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे केली जाणार आहेत. यासाठी मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर लाईनवर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असून प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करून घराबाहेर पडण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. (Central Railway)

https://www.prahaar.in/2026/09/26/drought-assessment-to-be-conducted-in-the-presence-of-farmers-revenue-minister-chandrashekhar-bawankule/

मेन लाईनवर मेगा ब्लॉक

माटुंगा-मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या काळात सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्या माटुंगा ते मुलुंड दरम्यानच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील आणि गंतव्यस्थानी सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. (Central Railway)

ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. माटुंगा येथे पुन्हा जलद मार्गावर आणल्यानंतर या गाड्याही सुमारे १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

याशिवाय खोपोली-सीएसएमटी लोकलच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दुपारी १.४८ ऐवजी ही लोकल दुपारी २.०६ वाजता सुटेल. (Central Railway)

prahaar.in/2026/09/26/mumbai-pune-expresswayhorrific-accident-on-mumbai-pune-expressway-two-dead-one-critically-injured/

हार्बर लाईनवरही ब्लॉक

कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या काळात सीएसएमटीहून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या तसेच पनवेल, बेलापूर आणि वाशीहून सीएसएमटीकडे येणाऱ्या अनेक लोकल फेऱ्या रद्द राहतील. (Central Railway)

प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. तसेच सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ मार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. (Central Railway)

पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेच्या देखभालीसाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येत असून प्रवाशांनी त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. (Central Railway)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here