Home ब्रेकिंग न्यूज एकनाथ शिंदेंमधील संवेदनशील नेत्याचा पुन्हा प्रत्यय; ड्युटीवरील पोलीस कोसळताच प्रोटोकॉल बाजूला सारून धावले!

एकनाथ शिंदेंमधील संवेदनशील नेत्याचा पुन्हा प्रत्यय; ड्युटीवरील पोलीस कोसळताच प्रोटोकॉल बाजूला सारून धावले!

0
एकनाथ शिंदेंमधील संवेदनशील नेत्याचा पुन्हा प्रत्यय; ड्युटीवरील पोलीस कोसळताच प्रोटोकॉल बाजूला सारून धावले!
एकनाथ शिंदेंमधील संवेदनशील नेत्याचा पुन्हा प्रत्यय; ड्युटीवरील पोलीस कोसळताच प्रोटोकॉल बाजूला सारून धावले! (Photo: Video Grab)

अनंत चतुर्दशीच्या गडबडीत व्हीआयपी बंदोबस्ताचा ताण आणि सकाळपासूनचे कर्तव्य यामुळे ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय नलावडे साकेत हेलिपॅडवर अचानक चक्कर येऊन कोसळले. नेमका याच वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हेलिकॉप्टरद्वारे पुण्याचा दौरा आटोपून तिथे लँडिंग झाले होते. आपल्या डोळ्यांसमोर खाकी वर्दीतील अधिकारी जमिनीवर कोसळल्याचे पाहताच उपमुख्यमंत्र्यांनी सुरक्षेचा ताफा आणि राजकीय बडेजाव बाजूला ठेवून थेट नलावडे यांच्या दिशेने धाव घेतली. तिथपर्यंत इतर सहकाऱ्यांनी नलावडे यांना तातडीने उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात असलेल्या रुग्णवाहिकेत नेले होते.

एकनाथ शिंदे यांनी केवळ आदेश देऊन न थांबता, स्वतःची कार त्या रुग्णवाहिकेच्या मागे ठेवत मार्ग मोकळा करून देण्याचं काम देखील केलं. आपल्या संपूर्ण ताफ्याचा मार्ग ज्युपिटर रुग्णालयाकडे वळवत त्यांनी अत्यंत कमी वेळेत नलावडे यांना रुग्णालयात दाखल केलं. तसेच डॉक्टरांना तातडीने उपचार सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि तत्परता यामुळेच या पोलिसाचे प्राण वाचवता येणे शक्य झाले. त्यामुळे या निमित्ताने त्यांच्यातील संवेदनशील नेत्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.

उपमुख्यमंत्री स्वतः पोलिसाला घेऊन रुग्णालयात आल्याचे समजताच ठाण्याचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी रुग्णालयात धाव घेतली. “नलावडे यांच्यावर सर्वोत्तम उपचार करा, खर्चाची कोणतीही काळजी करू नका,” अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्र्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या.

https://www.prahaar.in/2026/09/25/will-india-get-permanent-membership-portugal-proposes-significant-changes-at-the-unsc/

दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे हे नंतर आपल्या पुढील नियोजित कार्यक्रमांसाठी मुंबईकडे रवाना झाले. तर नलावडे यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली पुढील उपचार सुरू आहेत. असे असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारंवार फोनवरून त्यांच्या प्रकृतीची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेत आहेत.

गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्यातील पोलीस निरीक्षक विजय सांगाडे यांचा हृदय विकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यावेळीही त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. मात्र तरीही सांगाडे यांचा जीव वाचू शकला नाही. मात्र आज पुन्हा एकदा स्वतःच्या डोळ्यापुढे पोलीस अधिकारी कोसळताना पाहताच, शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः पुढाकार घेऊन या पोलिसाचे प्राण वाचवले.

आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे एका पोलिसाचे प्राण वाचले आहेत. या घटनेनंतर, “बाप्पाच्या आशीर्वादानेच नलावडे यांचे प्राण वाचले, मी तर केवळ निमित्तमात्र होतो,” अशी अत्यंत नम्र प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here