Home क्रीडा यशस्वी जयस्वाल श्रीलंकन खेळाडूला का नडला? ध्रुव जुरेलने बाहेर काढला जुना किस्सा

यशस्वी जयस्वाल श्रीलंकन खेळाडूला का नडला? ध्रुव जुरेलने बाहेर काढला जुना किस्सा

0
यशस्वी जयस्वाल श्रीलंकन खेळाडूला का नडला? ध्रुव जुरेलने बाहेर काढला जुना किस्सा
यशस्वी जयस्वाल श्रीलंकन खेळाडूला का नडला? ध्रुव जुरेलने बाहेर काढला जुना किस्सा (Photo: Video Grab)

भारतीय संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत केलं. पण दुसऱ्या सामन्यात विजय काही मिळवता आला नाही आणि सामना ड्रॉ झाला. त्यामुळे ही मालिका भारताने 1-0 ने आपल्या खिशात घातली. पण या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि असिथा फर्नांडो यांच्यात झालेला वाद चर्चेत राहिला. कारण यशस्वी जयस्वाल हेल्मेट घातलं असताना त्यानेच असिथाच्या डोक्यावर टक्कर देणार होता. पण इतर खेळाडूंच्या मध्यस्थीमुळे वाद शमला. असं असताना दोन्ही खेळाडूंच्या सामना फीमधून 25 टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात आली. पण तेव्हा नेमकं काय झालं होतं हे कोणालाच माहिती नव्हतं. आता याबाबतचा खुलासा ध्रुव जुरेलने केला आहे. ध्रुव जुरेल आणि यशस्वी जयस्वाल चांगले मित्र आहे आणि आयपीएलमध्ये एकाच फ्रेंचायझीकडून खेळतात.

ध्रुव जुरेलने सांगितलं काय घडलं ते?

आकाश चोप्रासोबत झालेल्या चर्चेत ध्रुव जुरेलने यशस्वी जयस्वाल का संतापला? याबाबत सांगितलं. ध्रुव जुरेलने सांगितलं की, जेव्हा यशस्वी जयस्वाल बाद झाला तेव्हा ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात होता. तेव्हा श्रीलंकन खेळाडू त्याला शिव्या देत होते. हा वाद कोलंबो कसोटीच्या पहिल्याच दिवशी झाला होता. फर्नांडोने यशस्वी जयस्वालची विकेट काढली आणि बाद झाल्यानंतर तो तंबूत जात होता तेव्हा गोलंदाजाकडे वळला. जयस्वालचा पारा चढला होता आणि त्याने हेल्मेट घातलेल्या डोक्यानेच टक्कर मारणार होता. पण या दोघांना इतर खेळाडूंनी कसं बसं वेगळं केलं.

https://www.prahaar.in/2026/09/25/virat-kohli-faces-potential-unwanted-hat-trick-record-against-west-indies-marathi-cricket-news/

ध्रुव जुरेलने सांगितलं की, ‘तुम्ही व्हिडीओ पाहिला तर यशस्वी जयस्वाल अचानक पाठी वळला. तो तंबूत जात होता. पण श्रीलंकन खेळाडूंकडून अपशब्द बोलले जात होते. जयस्वालने मला सांगितलं की श्रीलंक खेळाडू वारंवार शिव्या देत होते.’ जुरेलने या घटनेचा संदर्भ घेत जयस्वालने पुढे काय झालं ते सांगितलं. जसस्वालने श्रीलंकन खेळाडूला सांगितलं की, ‘बरं, तू मला आऊट केलं. तू सामान्य स्थितीत आक्रमकता दाखव ना.. पण शिव्या देऊ शकत नाही.’ यशस्वी जयस्वालने स्वत:हून काही वाद घातला नाही. त्याला डिवचल्याने तसं केल्याचं ध्रुव जुरेलने सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here