Home साप्ताहिक अर्थविश्व Federal Bank FASTag : जुन्या फास्टॅगला रामराम न करता बँक बदलणे झाले सोपे! फेडरल बँकेकडून क्रांतिकारी ‘वनटॅग’ सुविधा सुरू

Federal Bank FASTag : जुन्या फास्टॅगला रामराम न करता बँक बदलणे झाले सोपे! फेडरल बँकेकडून क्रांतिकारी ‘वनटॅग’ सुविधा सुरू

0
Federal Bank FASTag : जुन्या फास्टॅगला रामराम न करता बँक बदलणे झाले सोपे! फेडरल बँकेकडून क्रांतिकारी ‘वनटॅग’ सुविधा सुरू
Federal Bank launches revolutionary 'OneTag' facility

मुंबई : भारतातील डिजिटल वाहतूक व्यवस्थेत एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी पाऊल उचलत Federal Bank ने ‘OneTag – FASTag Portability’ ही नवीन सुविधा अधिकृतपणे सुरू केली आहे. Global Fintech Fest 2026 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या सुविधेचे शानदार अनावरण करण्यात आले. या नवीन सुविधेमुळे आता वाहनचालकांना आपल्या वाहनावरील जुना FASTag न बदलता किंवा न काढता, त्याची सेवा थेट फेडरल बँकेकडे हस्तांतरित (Port) करण्याची सुविधा मिळणार आहे.

FASTag पोर्टेबिलिटीची सुविधा सुरू करणाऱ्या मोजक्या अग्रगण्य बँकांमध्ये फेडरल बँकेचा समावेश झाला आहे. यामुळे ग्राहकांना अधिक सुलभ, जलद आणि त्रासमुक्त सेवा मिळणार असून डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढण्यास मदत होईल. या सुविधेअंतर्गत पात्र ग्राहकांना त्यांचा विद्यमान FASTag काढण्याची, तो बदलण्याची किंवा नवीन FASTag पुन्हा खरेदी करून बसवण्याची कोणतीही आवश्यकता राहणार नाही. सध्याचा FASTag वाहनावर तसाच कायम ठेवून तो फेडरल बँकेकडे सहज वर्ग करता येईल.(Federal Bank FASTag)

https://www.prahaar.in/2026/09/24/will-the-scope-of-the-us-iran-conflict-widen-iran-issues-a-direct-warning-of-extending-the-war-to-the-indian-ocean/

काय आहे FASTag हस्तांतरणाची सोपी प्रक्रिया?

ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि सोपी ठेवण्यात आली आहे:

• ग्राहकांना सर्वप्रथम RajmargYatra ॲपवर आपल्या वाहनाचा नोंदणी क्रमांक नोंदवावा लागेल.

• त्यानंतर एकदाच वापरण्यात येणाऱ्या संकेतांकाद्वारे (OTP) ओळख पडताळणी पूर्ण करून हस्तांतरणासाठी संमती द्यावी लागेल.

ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर 72 तासांच्या आत फेडरल बँकेच्या अधिकृत FASTag संकेतस्थळावर जाऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
या सर्व प्रक्रियेनंतर ग्राहक फेडरल बँकेच्या माध्यमातून आपल्या FASTag चे सहज व्यवस्थापन करू शकतील.(Federal Bank FASTag)

https://www.prahaar.in/2026/09/24/can-you-talk-to-ai-without-a-phone-what-exactly-is-metas-muse-charm/

मुख्य अटी आणि फायदे:

वेळ आणि त्रासाची बचत: वाहनावरील FASTag काढण्याची किंवा नवीन लावण्याची कटकट पूर्णपणे संपली आहे.

• वाहन वर्ग: सध्या ही सुविधा Vehicle Class 4 (VC4) अंतर्गत येणाऱ्या कार, जीप आणि व्हॅनसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

• अटी: या सुविधेचा लाभ घेण्यासाठी FASTag सक्रिय असणे, त्यावर वाहन क्रमांक अचूक अद्ययावत असणे आणि तो टॅग यापूर्वी अन्य कोणत्याही बँकेतून हस्तांतरित केलेला नसणे अनिवार्य आहे.

इतर बँकांकडून सेवा घेणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुविधा अत्यंत फायदेशीर ठरणार असून यामुळे डिजिटल पेमेंट क्षेत्रातील फेडरल बँकेचे स्थान अधिक मजबूत होणार आहे. (Federal Bank FASTag)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here