Home साप्ताहिक अर्थविश्व Starbucks : स्टारबक्सचा मोठा निर्णय; उत्तर अमेरिकेतील 250 कॉफी शॉप्स बंद होणार

Starbucks : स्टारबक्सचा मोठा निर्णय; उत्तर अमेरिकेतील 250 कॉफी शॉप्स बंद होणार

0
Starbucks : स्टारबक्सचा मोठा निर्णय; उत्तर अमेरिकेतील 250 कॉफी शॉप्स बंद होणार

मुंबई : स्टारबक्स आपल्या स्टोअर नेटवर्कचा आढावा घेत असून, या प्रक्रियेअंतर्गत उत्तर अमेरिकेतील 250 कॉफी शॉप्स आठवड्याच्या अखेरीस बंद करण्यात येणार आहेत. कंपनीचे CEO माईक ग्रॅम्स यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशातून ही माहिती दिली. (Starbucks)

ग्रॅम्स यांच्या म्हणण्यानुसार, बंद करण्यात येणारी दुकाने एकतर कंपनीच्या आर्थिक अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरली आहेत किंवा ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना अपेक्षित अनुभव देण्यात अडचणी येत आहेत. मात्र, कोणती ठिकाणे बंद होणार किंवा त्यापैकी अमेरिकेतील किती स्टोअर्स आहेत, याचा तपशील कंपनीने जाहीर केलेला नाही. (Starbucks)

https://www.prahaar.in/2026/09/24/switching-banks-without-ditching-your-old-fastag-has-become-easy-federal-bank-launches-revolutionary-onetag-facility/

1,500 स्टोअर्सचे नूतनीकरण

स्टारबक्स उत्तर अमेरिकेतील आपल्या स्टोअर्समध्ये सुधारणा करण्याचे काम सुरू ठेवणार आहे. अधिक आरामदायक आणि स्वागतार्ह वातावरण तयार करण्याच्या उद्देशाने 30 सप्टेंबरपर्यंत सुमारे 1,500 स्टोअर्सचे नूतनीकरण पूर्ण करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. (Starbucks)

https://www.prahaar.in/2026/09/24/rain-intensity-picks-up-again-in-maharashtra-alert-issued-for-21-districts-including-mumbai-possibility-of-stormy-rain-in-these-areas/

कर्मचाऱ्यांना पर्यायी नोकरीची संधी

बंद होणाऱ्या स्टोअर्समधील कर्मचाऱ्यांना जवळच्या इतर स्टारबक्स स्टोअर्समध्ये उपलब्ध पदांवर सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पुन्हा नियुक्ती शक्य न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती सहाय्यता दिली जाईल.

दरम्यान, काही स्टोअर्स बंद होत असली तरी स्टारबक्स उत्तर अमेरिकेतील विस्तार सुरूच ठेवणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. (Starbucks)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here