Home क्रीडा Asian Games 2026 : भारताचा निशाणा अचूक! आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये अनंतजीत-परिनाझला कांस्यपदक

Asian Games 2026 : भारताचा निशाणा अचूक! आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये अनंतजीत-परिनाझला कांस्यपदक

0
Asian Games 2026 : भारताचा निशाणा अचूक! आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये अनंतजीत-परिनाझला कांस्यपदक
Anantjeet-Parinaaz win bronze medal at Asian Games ( source: instagram @anant122)

नागोया: 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने नेमबाजीच्या खेळात आणखी एक अभिमानास्पद कामगिरी केली आहे. भारतीय नेमबाज अनंतजीत सिंग नरुका आणि परिनाझ धालीवाल या जोडीने मिश्र सांघिक स्किट प्रकारात उत्कृष्ट खेळ करत देशासाठी कांस्यपदक जिंकले आहे. विशेष म्हणजे, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील मिश्र सांघिक स्किट प्रकारातील भारताचे हे पहिलेच पदक ठरले असून, या विजयामुळे भारताने पदकतालिकेत 15 वे स्थान पटकावले आहे.(Parinaaz Dhaliwal bronze)

https://www.prahaar.in/2026/09/24/horrific-railway-accident-in-navi-mumbai-car-plunged-onto-the-railway-tracks-from-belapurs-parsik-hill-local-train-services-disrupted/

अंतिम फेरीत अत्यंत अटीतटीच्या लढतीत या भारतीय जोडीने 6 सीरीजनंतर एकूण 44 गुण मिळवले. या शर्यतीत चीनच्या संघाने 52 गुणांची कमाई करत केवळ सुवर्णपदकच जिंकले नाही, तर नवा विश्वविक्रमही प्रस्थापित केला. चीनने जानेवारी महिन्यात कतारने प्रस्थापित केलेला 47 गुणांचा जुना विश्वविक्रम मागे टाकला. दुसरीकडे, दक्षिण कोरियाने 51 गुणांची कमाई करत रौप्यपदक आपल्या नावावर केले.(Asian Games 2026)

पात्रता फेरीपासून शानदार कामगिरी

यापूर्वी पात्रता फेरीत अनंतजीत आणि परिनाझ या भारतीय जोडीने 150 पैकी 138 गुणांची कमाई करत चौथे स्थान मिळवले होते. या फेरीत चीन (140 गुण), दक्षिण कोरिया (143 गुण) आणि कतार (145 गुण) हे देश भारताच्या पुढे होते. मात्र, अंतिम फेरीत अत्यंत दबावाखालीही भारतीय खेळाडूंनी कमालीचा संयम दाखवत भारतासाठी पदकाची कमाई केली.(Asian Games 2026)

https://www.prahaar.in/2026/09/24/mumbaicha-raja-visarjan-2026-22-ft-idol-to-make-historic-deep-sea-immersion-from-modern-barge-ship-at-girgaon-chowpatty/

अनंतजीत आणि परिनाझ या दोन्ही प्रतिभावान खेळाडूंची ही या स्पर्धेतील दुसरी कामगिरी आहे. यापूर्वी अनंतजीतने पुरुषांच्या स्किट सांघिक स्पर्धेत, तर परिनाझने रायझा ढिल्लन आणि महेश्वरी चौहान यांच्यासह महिलांच्या स्किट सांघिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.

जयपूरचा नेमबाज अनंतजीत सिंग नरुका आणि पतियाळाची गुणी नेमबाज परिनाझ धालीवाल यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय अनुभवाच्या जोरावर पुन्हा एकदा भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. दुसरीकडे, पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत भारताच्या कमलजीत, केदारलिंग बालकृष्ण आणि आकाश भारद्वाज यांच्या संघाला 1727-53x गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या ऐतिहासिक कांस्यपदकामुळे संपूर्ण देशभरातून या दोन्ही युवा खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.(Anantjeet Naruka bronze)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here