पोलादपूर : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील ओंबळी गावात वडिलांनी स्वतःच्या 24 वर्षीय मुलावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (23 सप्टेंबर) सायंकाळी घडली. हल्ल्यानंतर फरार झालेल्या वडिलांना पोलिसांनी अवघ्या पाच तासांत ताब्यात घेतले. (Poladpur Crime News)
https://www.prahaar.in/2026/09/24/bmc-official-visiting-for-ganeshotsav-holidays-killed-chilling-incident-outside-her-house-at-midnight-sparks-shockwaves-across-mumbai-and-nashik/
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन बजरंग चिकणे हे काही महिन्यांपूर्वी मुंबईहून पोलादपूर शहराजवळील लोहारे देऊळकोंड परिसरातील निर्जन इमारतीत राहण्यास आले होते. मंगळवारी सायंकाळी अज्ञात कारणावरून झालेल्या वादातून त्यांनी मुलगा साहिल सचिन चिकणे (24) याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.(Poladpur Crime News)
https://www.prahaar.in/2026/09/24/whatsapp-wedding-card-scam-ahmedabad-cyber-fraud/
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या साहिलचा मृत्यू झाला. घटनेनंतर सचिन चिकणे घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे शोध घेत त्यांना पाच तासांत ताब्यात घेतले. साहिलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.(Poladpur Crime News)