Home गणेशोत्सव Lalbaugcha Raja Visarjan 2026 : लालबागच्या राजाच्या राजेशाही विसर्जन मिरवणुकीची संपूर्ण रूपरेषा जाहीर; पोलिसांना विशेष सलामी!

Lalbaugcha Raja Visarjan 2026 : लालबागच्या राजाच्या राजेशाही विसर्जन मिरवणुकीची संपूर्ण रूपरेषा जाहीर; पोलिसांना विशेष सलामी!

0
Lalbaugcha Raja Visarjan 2026 : लालबागच्या राजाच्या राजेशाही विसर्जन मिरवणुकीची संपूर्ण रूपरेषा जाहीर; पोलिसांना विशेष सलामी!

मुंबई : लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आणि मुंबईची शान असलेल्या ‘लालबागच्या राजा’च्या (lalbuagcha Raja Visarjan 2026) विसर्जन सोहळ्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने २५ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या भव्य आणि राजेशाही विसर्जन मिरवणुकीचे संपूर्ण वेळापत्रक आणि मार्ग जाहीर करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांना अनोखी सलामी देत, विविध वस्त्यांमधून आणि धार्मिक सौहार्दाचे दर्शन घडवत ही मिरवणूक गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.

असं असेल २५ सप्टेंबरला विसर्जन

सकाळी ९:०० वाजता : लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीला अधिकृतपणे सुरुवात होईल.

सकाळी १०:०० वाजता : बाप्पाची पारंपरिक आणि विधीवत उत्तरपूजा संपन्न होईल.

दुपारी १२:०० वाजता : उत्तरपूजेनंतर लालबागच्या राजाची प्रसिद्ध ‘राजेशाही विसर्जन मिरवणूक’ मंडपातून बाहेर पडेल.

दुपारी १:०० वाजता : बाप्पाचे आगमन मुख्य प्रवेशद्वाराजवळ होईल.

‘माणूस उभा आहे वर्दीतला… म्हणून उत्सव साजरा होतोय गर्दीतला!’

दुपारी १ वाजता मुख्य प्रवेशद्वाराजवळ आगमन झाल्यानंतर, संपूर्ण सणात अहोरात्र सेवा बजावणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सन्मानार्थ लालबागच्या राजाच्या वतीने मुंबई पोलिसांना विशेष सलामी दिली जाणार आहे.

असा असेल राजेशाही मिरवणुकीचा मार्ग :

लालबागच्या राजाची मिरवणूक लालबाग मार्केटमधून निघून पुढील ऐतिहासिक आणि प्रमुख मार्गांवरून पुढे सरकेल:

मुख्य प्रवेशद्वार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भारतमाता सिनेमा, लालबाग पोलिस चौकी, पुन्हा लालबाग मुख्य प्रवेशद्वार.

श्रॉफ बिल्डिंग : येथे दरवर्षीप्रमाणे बाप्पावर विलोभनीय पुष्पवृष्टी केली जाईल.

चिंचपोकळी ब्रिज, भायखळा रेल्वे स्टेशन, हिंदुस्थान मशीद.

मुंबई अग्निशमन दल मुख्यालय : या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्यांचे सायरन वाजवून बाप्पाला शिस्तबद्ध सलामी दिली जाईल.

खडा पारसी, दोन टाकी : या ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून लालबागच्या राजाला पारंपरिक पद्धतीने पुष्पहार अर्पण करून स्वागत केले जाईल.

कुंभारवाडा, सुतार गल्ली, माधव बाग, व्ही. पी. रोड, प्रार्थना समाज, गिरगाव चौपाटी सिग्नल, मुंबई महापालिका स्वागत कक्ष (गिरगाव चौपाटी), लालबागचा राजा विसर्जन तराफा.

२६ सप्टेंबर : अरबी समुद्रात अंतिम विसर्जन

रात्रभर चालणाऱ्या या अलोट जनसागराच्या आणि ढोल-ताशांच्या गजरातील मिरवणुकीनंतर, २६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणूक खास तयार करण्यात आलेल्या तराफ्यावरून अरबी समुद्रात पुढे सरकेल आणि बाप्पाला अश्रूपूर्ण नयनांनी, “पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात निरोप दिला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here