नागोया: जपानमधील आयची येथे सुरू असलेल्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले आहे. उपांत्य फेरीत बलाढ्य चीनविरुद्ध 3-1 असा संघर्षपूर्ण पराभव पत्करावा लागला असला, तरी भारताने सलग दुसऱ्यांदा आशियाई स्पर्धेत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. याआधी हाँगझोऊ 2023 आशियाई स्पर्धेत भारताने ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले होते.(Indian Badminton Team)
https://www.prahaar.in/2026/09/23/chinmayi-more-makes-a-fresh-start-on-the-small-screen-with-dhaktya-sunbai-shares-special-details-about-the-role-of-radhika/
सात्विक-चिराग यांचा दमदार विजय
उपांत्य फेरीच्या लढतीत भारताची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. पहिल्या एकेरीच्या सामन्यात भारताच्या लक्ष्य सेन याला जागतिक क्रमवारीतील दिग्गज खेळाडू शी युकीकडून 21-16, 21-18 असा पराभव स्वीकारावा लागला. लक्ष्यने पहिल्या गेममध्ये चांगली सुरुवात केली व दुसऱ्या गेममध्ये 16-16 अशी बरोबरीही साधली, पण अखेरीस चिनी खेळाडूने बाजी मारली.(Indian Badminton Team)
मात्र, त्यानंतर भारताची स्टार पुरुष दुहेरीची जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी अप्रतिम खेळ करत पुनरागमन केले. विद्यमान जागतिक विजेते लियांग वेईकेंग आणि वांग चांग या मजबूत चिनी जोडीविरुद्ध त्यांनी 21-11, 22-20 असा शानदार विजय मिळवला आणि भारताचे आव्हान जिवंत ठेवले. दुसऱ्या गेममध्ये चिनी जोडीने कडवी टक्कर देत 20-20 अशी बरोबरी केली होती, पण भारतीय जोडीने संयम राखत सामना आपल्या नावावर केला आणि लढत 1-1 अशी बरोबरीत आणली.
https://www.prahaar.in/2026/09/23/ipl-chairman-arun-singh-dhumal-announced-that-the-ipl-2027-mini-auction-process-will-take-place-in-goa/
चीनचे पारडे जड
तिसऱ्या सामन्यात आयुष शेट्टी याचा सामना जागतिक क्रमवारीत 12 व्या स्थानी असलेल्या ली शी फेंगशी झाला. यात आयुषचा 21-19, 21-13 असा पराभव झाल्याने चीनने 2-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर चौथ्या सामन्यात भारताच्या हरिहरन अमसाकरुणन आणि एम.आर. अर्जुन या जोडीला हे जी टिंग आणि लिऊ यी यांच्याविरुद्ध 21-16, 17-21, 21-9 असा पराभव पत्करावा लागला. यामुळे भारताचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले, पण कांस्यपदकावर आपले नाव कोरण्यात संघ यशस्वी ठरला.(Indian Badminton Team)
उपांत्यपूर्व फेरीत यजमान जपानचा 3-0 असा पराभव करत भारताने आपले पदक निश्चित केले होते. या स्पर्धेतील यशानंतर भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.