Home ताज्या घडामोडी Mumbai Music Festival : दादरमध्ये तीन दिवस सुरांची बरसात! २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान रंगणार ‘गायन वादन महोत्सव’

Mumbai Music Festival : दादरमध्ये तीन दिवस सुरांची बरसात! २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान रंगणार ‘गायन वादन महोत्सव’

0
Mumbai Music Festival : दादरमध्ये तीन दिवस सुरांची बरसात! २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान रंगणार ‘गायन वादन महोत्सव’

मुंबई : संगीतप्रेमी रसिकांसाठी मुंबईत तीन दिवसीय ‘गायन वादन महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने सोमवार, २८ सप्टेंबर ते बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा महोत्सव रंगणार आहे. दररोज सायंकाळी ६ वाजता दादर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. (Mumbai Music Festival)

https://www.prahaar.in/2026/09/23/chinmayi-more-makes-a-fresh-start-on-the-small-screen-with-dhaktya-sunbai-shares-special-details-about-the-role-of-radhika/

तीन दिवस, तीन सुरेल कार्यक्रम

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, सोमवार, २८ सप्टेंबर रोजी ‘लतानंद’ हा विशेष कार्यक्रम सादर होईल. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अजरामर गीतांमधील वाद्यसुरांचा प्रवास या कार्यक्रमातून उलगडणार असून, कमलेश भडकमकर आणि सहकारी सादरीकरण करणार आहेत. (Mumbai Music Festival)

मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी ‘सप्तसूर’ हा कार्यक्रम रसिकांच्या भेटीला येईल. सुरांच्या विश्वातील अविस्मरणीय संध्याकाळ अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार असून, केदार देशमुख आणि त्यांचा संच सादरीकरण करणार आहे.

बुधवार, ३० सप्टेंबर रोजी ‘भावबंध’ या कार्यक्रमातून भावगीतांचे रेशीमधागे आणि चित्रपट गीतांची स्पंदने अनुभवता येतील. प्राची कोकीळ मराठे आणि सहकारी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. (Mumbai Music Festival)

https://www.prahaar.in/2026/09/23/will-ai-surpass-humans-by-2028-elon-musks-bold-prediction/

संगीतपरंपरेच्या जतनासाठी सांस्कृतिक उपक्रम

सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. (Mumbai Music Festival)

महाराष्ट्राच्या संगीतपरंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासोबतच विविध संगीत प्रकार व कलाविष्कार रसिकांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

महोत्सवातील सर्व कार्यक्रमांसाठी प्रवेश विनामूल्य असून, मुंबईतील संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या तीन दिवसीय संगीत महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे. (Mumbai Music Festival)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here