मुंबई : राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा मत्स्यव्यवसायावर होणारा परिणाम लक्षात घेता, ‘दुष्काळ ट्रिगर-१’मध्ये समाविष्ट तालुक्यांतील मत्स्य तलाव, जलाशय आणि संबंधित जलस्रोतांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. (Nitesh Rane)
प्रत्येक जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीची अचूक माहिती जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावी. तसेच मत्स्यव्यवसायावर होणाऱ्या परिणामाची तीव्रता शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी, असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक झाली. (Nitesh Rane)
https://www.prahaar.in/2026/09/23/in-the-wake-of-drought-the-government-prioritizes-water-conservation-over-cement-roads/
जलस्रोतांची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल द्या
दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे मत्स्यव्यवसाय करताना येणाऱ्या अडचणींची माहिती संबंधित प्रादेशिक अधिकाऱ्यांनी संकलित करावी. यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून दुष्काळाची तीव्रता आणि जलस्रोतांची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
मत्स्य तलाव आणि जलाशयांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यातील पाणीसाठ्याची स्थिती नोंदवावी आणि त्यावर आधारित अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश राणे यांनी दिले. (Nitesh Rane)
मच्छिमारांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता
अपुरा पाऊस आणि कमी पाणीसाठ्यामुळे मत्स्यबीज संचयन तसेच मत्स्योत्पादनावर परिणाम होत आहे. मत्स्यबीज उत्पादन केंद्रांमधील उत्पादनावरही आवश्यकतेनुसार परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण रोजगार आणि मत्स्योत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
https://www.prahaar.in/2026/09/23/important-news-for-bank-customers-banks-will-remain-open-on-sunday-september-27-find-out-the-details/
या पार्श्वभूमीवर मच्छिमारांच्या उपजीविकेवर होणारा परिणाम, जलस्रोतांमधील पाणीसाठा आणि मत्स्य उत्पादनाची स्थिती यांची अचूक माहिती संकलित करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. (Nitesh Rane)
आवश्यक उपाययोजनांसाठी विभागाला सूचना
दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे मत्स्यव्यवसाय करणे अडचणीचे ठरत असल्याने, त्याचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन आवश्यक उपाययोजनांसाठी विभागाने तत्पर राहावे, असे मंत्री राणे यांनी सांगितले. (Nitesh Rane)
संबंधित अधिकाऱ्यांनी संकलित केलेली माहिती जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून त्यानुसार आवश्यक कार्यवाही करावी, असेही निर्देश देण्यात आले.
या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. (Nitesh Rane)