Home महाराष्ट्र अहिल्यानगर Beef Seizure : पोलिसांच्या छाप्यात साडेपाच लाखांचे गोमांस जप्त तोफखाना पोलिसांची कोठला भागात कारवाई; दोन आरोपी ताब्यात, मुख्य फरार 

Beef Seizure : पोलिसांच्या छाप्यात साडेपाच लाखांचे गोमांस जप्त तोफखाना पोलिसांची कोठला भागात कारवाई; दोन आरोपी ताब्यात, मुख्य फरार 

0
Beef Seizure : पोलिसांच्या छाप्यात साडेपाच लाखांचे गोमांस जप्त तोफखाना पोलिसांची कोठला भागात कारवाई; दोन आरोपी ताब्यात, मुख्य फरार 
Maharashtra Police

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राबवल्या जात असलेल्या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी एका गोडाऊनवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ५ लाख ४५ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज आणि गोमांस जप्त करण्यात आले असून दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर मुख्य आरोपी फरार झाला आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते.(Beef Seizure)

https://www.prahaar.in/2026/09/23/pune-ganesh-immersion-miravnuk-2026-how-far-has-the-miravnuk-reached-get-live-tracking-and-traffic-updates-with-just-a-click-from-the-comfort-of-your-home-pune-police-are-fully-prepared-for-the-ganpat/

या आदेशांनुसार २२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत अवैध धंद्यांची माहिती काढत होते. गुप्त माहितगाराकडून पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की, अहिल्यानगर शहरातील कोठला झोपडपट्टी भागातील कुरेशी नाष्टा सेंटरच्या मागे कुरेशी हॉटेलचा मालक समीर बाबूलाल कुरेशी हा आपल्या हस्तकांमार्फत गोवंश प्राण्यांची कत्तल करून, हॉटेल कुरेशी येथे वापरण्यासाठी व इतरांना विक्री करण्यासाठी गोमांस साठवून ठेवत आहे. बातमी मिळताच पाटील व त्यांच्या पथकाने तत्काळ नमूद ठिकाणी छापा टाकला.(Tofkhana Police)

https://www.prahaar.in/2026/09/23/nashik-ganesh-visarjan-2026-changes-in-ganesh-immersion-in-nashik-due-to-kumbh-mela-activities/

या छाप्यादरम्यान पोलिसांनी २,७०० किलो गोमांस (किंमत ५,४०,००० रुपये), ५०० रुपये किमतीचे ४ धारदार सत्तूर (किंमत २,००० रुपये), ३०० रुपये किमतीचे ५ धारदार चाकू (किंमत १,५०० रुपये) आणि २ इलेक्ट्रिक वजन काटे (किंमत २,००० रुपये) असा एकूण ५,४५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.सदर कारवाईत मुख्य आरोपी समीर बाबूलाल कुरेशी (रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट, अहिल्यानगर) हा फरार झाला असून, त्याचे हस्तक नूर लाल सय्यद (वय ४२ वर्ष, रा. फकीरवाडा, अहिल्यानगर) आणि जगदीश उर्फ सोनू कमल दास (वय ३६ वर्ष, रा. कोठला, अहिल्यानगर) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.(Tofkhana Police)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here