Home साप्ताहिक अर्थविश्व IPO Investment : एलिवेट कॅम्पसेसचा २,१०० कोटी रुपयांचा आयपीओ खुला; पैसे गुंतवण्याची शेवटची तारीख कोणती?

IPO Investment : एलिवेट कॅम्पसेसचा २,१०० कोटी रुपयांचा आयपीओ खुला; पैसे गुंतवण्याची शेवटची तारीख कोणती?

0
IPO Investment : एलिवेट कॅम्पसेसचा २,१०० कोटी रुपयांचा आयपीओ खुला; पैसे गुंतवण्याची शेवटची तारीख कोणती?
Elevate Campuses IPO

नवी दिल्ली: शैक्षणिक संस्थांसाठी इन्फ्रास्ट्रक्चरल मॅनेजमेंट सेवा पुरवणाऱ्या एलिवेट कॅम्पसेस लिमिटेड (Elevate Campuses Limited) कंपनीचा २,१०० कोटी रुपयांचा बहुप्रतिक्षित आयपीओ (IPO) आजपासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये गुंतवणूकदारांना २५ सप्टेंबरपर्यंत बोली लावता येणार आहे. लाँचिंगच्या पहिल्याच दिवशी दुपारी १.३० वाजेपर्यंत या आयपीओला ११ टक्के सब्स्क्रिप्शन मिळाले होते.(IPO Investment)

https://www.prahaar.in/2026/09/23/a-major-leap-for-indias-economic-progress-fitch-ratings-significantly-raises-indias-gdp-growth-forecast-what-exactly-is-the-projected-increase/

आयपीओचा तपशील आणि प्राईस बँड

या आयपीओसाठी कंपनीने ३४३ ते ३६२ रुपये प्रति शेअर असा प्राईस बँड निश्चित केला आहे. या इश्यूचा लॉट साइज ४१ शेअर्सचा आहे. (Elevate Campuses IPO 2026)

  • किमान गुंतवणूक: किरकोळ गुंतवणूकदार (Retail Investors) किमान एका लॉटसाठी म्हणजेच ४१ शेअर्ससाठी बोली लावू शकतात, ज्यासाठी १४,८४२ रुपये गुंतवावे लागतील.

  • कमाल गुंतवणूक: किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त १३ लॉटमध्ये ५३३ शेअर्ससाठी १,९२,९४६ रुपये गुंतवून बोली लावू शकतात.

या संपूर्ण आयपीओअंतर्गत १ रुपया दर्शनी मूल्य (Face Value) असलेले एकूण ५,८०,११,०४९ नवीन शेअर्स जारी केले जात आहेत. यामध्ये क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी (QIB) ७५ टक्के, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी १० टक्के आणि बिगर-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्ससाठी (NII) १५ टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. या इश्यूचे व्यवस्थापन जेएम फायनान्शियल लिमिटेड करत असून, केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड हे रजिस्ट्रार आहेत.(IPO Investment)

https://www.prahaar.in/2026/09/23/nashik-accident-news-two-trucks-collide-near-pimpalgaon-minister-girish-mahajan-stops-his-convoy-to-assist-the-injured-at-the-scene-and-helps-with-rescue-operations/

महत्त्वाच्या तारखा

  • बोली लावण्यासाठी अंतिम तारीख: २५ सप्टेंबर

  • शेअर्स अलॉटमेंट: २८ सप्टेंबर

  • डिमॅट अकाउंटमध्ये क्रेडिट: २९ सप्टेंबर

  • स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग: ३० सप्टेंबर (बीएसई आणि एनएसईवर अपेक्षित)

https://www.prahaar.in/2026/09/23/do-not-give-the-mpsc-agitation-a-political-turn-students-should-focus-on-their-studies-vikram-pachpute/

कंपनीची वित्तीय स्थिती

सेबीकडे सादर करण्यात आलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार (RHP), कंपनीची आर्थिक स्थिती सातत्याने सुधारत आहे:

मात्र, याच काळात कंपनीवरील कर्जाचा बोजा ९८४.७१ कोटींवरून वाढून ४,१२०.५३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच कंपनीचे ईबीआयटीडीए (EBITDA) २०२५-२६ मध्ये ५४५ कोटी रुपयांवर पोहोचले असून, नेटवर्थ ९५६.२९ कोटी रुपये नोंदवले गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here