मुंबई : गणेशोत्सवाच्या आनंदात आणि उत्साहात असताना मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील कामराज नगर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. ‘सेव्हन स्टार स्पोर्ट्स क्लब’ गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाची भररस्त्यात धारदार चाकूने छातीत वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण घाटकोपर परिसरात एकच शोककळा आणि तणावाचे वातावरण पसरले आहे.(Ganesh Mandal Chairman)
https://www.prahaar.in/2026/09/21/minister-nitesh-rane-announced-that-special-mechanism-would-be-set-up-to-curb-the-rising-instances-of-online-gaming-online-matka-and-gambling-in-sindhudurg-district/
नेमकी काय आहे घटना?
प्राथमिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सव मंडळाच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून आणि जुन्या वैमनस्यातून हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.१८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास, स्थानिक बीएमसी शाळेजवळील गणेशोत्सव मंडळाचा एक कार्यकर्ता तिथे उभा होता. “रागाने का पाहिले?” या छोट्याशा गैरसमजातून एका तरुणाने त्या कार्यकर्त्याला चापट मारली. या प्रकारची माहिती मिळताच मंडळाचे अध्यक्ष संबंधित तरुणाला जाब विचारण्यासाठी गेले. तिथून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.(Ganesh Mandal Chairman)
https://www.prahaar.in/2026/09/21/iit-bombay-suspends-professor-suryanarayana-doolla-as-dean-with-immediate-effect-amid-probe-into-student-sahil-wakodes-death/
चाकूने छातीत वार करून संपवला जीव
वाद विकोपाला गेल्यावर आरोपीने आपल्या इतर काही साथीदारांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. हे सर्वजण तिथे जमले आणि त्यांनी मंडळाच्या अध्यक्षांशी वाद घालायला सुरुवात केली. वाद एवढा वाढला की, मुख्य आरोपीने आपल्या खिशातून धारदार चाकू काढून थेट अध्यक्षांच्या छातीत भोसकला. या अचानक झालेल्या प्राणघातक हल्ल्यात अध्यक्ष गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
गणेशोत्सवाच्या काळात अशा प्रकारच्या हिंसक घटनेमुळे सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.(Ganesh Mandal Chairman)