मुंबई: अन्न- औषध प्रशासनाकडून मुंबई, पुणे, कोकणसह इतरत्र महाराष्ट्रामध्ये धडक कारवाई केली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न विभागाकडून 1.36 कोटी रुपयांचा धडक कारवाई करत संशयास्पद, भेसळयुक्त आणि अस्वच्छ खवा, मावा, पेढा, तूप, तेल, बर्फी, जर्दाळू, मनुका, गूळ, मिठाई आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. राज्यभर एकूण 64 हॉटेल, रेस्टॉरंट, धाबा इ. च्या तपासणी करून 12 अन्न आस्थापनाचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. तर, 36 आस्थापनांना सुधारणा नोटिस देण्यात आली आहे. अन्नपदार्थ पान मसाला, गुटखा विक्री, वितरण, वाहतूक प्रकरणी प्रथम खबरी अहवालाप्रकरणी 14 त्यामध्ये 15 व्यक्तींना अटक करून एक कोटी 38 लाख 74 हजार 043 रूपये किंमतीचा साठा जप्त केला.
https://www.prahaar.in/2026/09/21/revenue-minister-adarsh-registration-pattern-to-be-adopted-nationwide-minister-chandrashekhar-bawankule-praised-by-union-secretary/
सणासुदीचे दिवस लक्षात घेता नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत या उद्देशाने अन्न- औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात विशेष तपासणी आणि धडक कारवाईची मोहीम राववली आहे. या मोहिमेअंतर्गत विविध भागांतून निकृष्ट दर्जा, भेसळ, विनापरवाना विक्री, अस्वच्छता आणि लेवल उल्लंघनाच्या संशयावरून अन्नपदार्थांचा साठा जप्त आणि नष्ट करण्यात आला आहे. 32 हजार 023.015 किलोचा एकूण साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या एकूण साठ्याची किंमत एक कोटी 36 लाख 20 हजार 735 रूपये इतकी आहे. मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये कारवाई केलेली आहे. कारवाई दरम्यान, जप्त केलेल्या खवा, मावा, पेढा, तूप, तेल, बर्फी, जर्दाळू, मनुका, गूळ, मिठाई आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे.
https://www.prahaar.in/2026/09/21/minister-nitesh-rane-announced-that-special-mechanism-would-be-set-up-to-curb-the-rising-instances-of-online-gaming-online-matka-and-gambling-in-sindhudurg-district/
मुंबईतील 10 अस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित केले आहे. यामध्ये मुंबई, मालाड, कांदिवली, अंधेरी, चेंबूर, घाटकोपर परिसरातील हॉस्पिटल्सचा समावेश आहे. शिवाय, पुण्यातील 2 अन्न अस्थापनांचेही परवाने केले. गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू या प्रतिबंधित पदार्थांवरही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागामध्ये ही धडक कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त करत काही विभागांमध्ये आरोपींनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. शिवाय दुकानांच्या शटरलाही टाळं ठोकण्यात आलं आहे. महाराष्ट्रामध्ये दररोज अन्न- औषध प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्याचे हित साधत ही कारवाई केली जात आहे.