Home ब्रेकिंग न्यूज ‘बिग बॉस ७’ फेम सोफिया हयात भाईजानवर भडकली; म्हणाली, “सलमान खान एक नंबरचा ढोंगी आणि…”

‘बिग बॉस ७’ फेम सोफिया हयात भाईजानवर भडकली; म्हणाली, “सलमान खान एक नंबरचा ढोंगी आणि…”

0
‘बिग बॉस ७’ फेम सोफिया हयात भाईजानवर भडकली; म्हणाली, “सलमान खान एक नंबरचा ढोंगी आणि…”
Salman Khan responds to weight trolling on Bigg Boss 20

मुंबई: ‘बिग बॉस २०’चा शनिवारी रात्री ‘विकेंड का वार’ चा एपिसोड टेलिकास्ट झाला. हा एपिसोड सध्या सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आहे. काल भर शोमध्ये भाईजानने आपला शर्ट काढून बॉडी शेमिंगवरून करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री कतरिना कैफ कमालीची चर्चेत आहे. तिला सध्या बॉडी शेमिंगमुळे नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तिच्या समर्थनार्थ अख्खी बॉलिवूड इंडस्ट्री बोलत असून काही राजकीय महिला नेत्या सुद्धा उभ्या राहिल्या आहेत.

https://www.prahaar.in/2026/09/20/salman-khan-furious-over-trolling-of-katrina-takes-off-shirt-on-bigg-boss-20/

आता अशातच सलमान खानवर ‘बिग बॉस ७’ ची कंटेस्टंट सोफिया हयात चांगलीच भडकली आहे. तिने सलमानला ढोंगी आणि मुर्ख म्हणत त्याच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाचा खुलासा केला आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून सोफियाने सलमानवर टीकेचा भडीमार केला आहे. शनिवारी ‘विकेंड का वार’ च्या एपिसोडमध्ये सलमानने ‘बॉडी-शेमिंग’च्या विरोधात बोलत असताना आपला शर्ट काढला होता. ह्याच मुद्द्यावरून एक व्हिडिओ शेअर करत सोफिया सलमानवर कमालीची संतापली आहे. ती म्हणाली की, “सलमान हा एक नंबरचा ढोंगी आणि मूर्ख माणूस आहे. मी जेव्हा ‘बिग बॉस’च्या घरामध्ये होते, तेव्हा त्याने माझ्या शरीरावरून आणि चेहऱ्यावरून टीका केली होती. त्याच वेळी त्याने गौहरचं शरीर कसं सुंदर आहे, असं म्हणत तिचं कौतुक केले होतं.”

 

सोफियाने ‘डेविल विशाल’नावाच्या एका युजरचा व्हिडिओ रिपोस्ट करत एक्सवर आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सोफियाने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक युजर्सकडून समर्थन करण्यात येत आहे. अनेकांनी तिची बाजू घेत तिचं समर्थन केलं आहे. तर काही युजर्सकडून तिला ट्रोल केलं जात आहे. दरम्यान, शनिवारच्या ‘वीकेंड का वार’ भागात सलमान खानने त्याच्या लूकवरून, वयावरून आणि बॉडीवरून ट्रोल करणाऱ्यांना खास आपल्या शैलीत चांगलाच धडा शिकवला आहे. त्याने भर शोमध्ये त्याला करणाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भर शोमध्ये अभिनेत्याने आपला शर्ट काढत ट्रोलर्सला खडेबोल सुनावले. सोबतच कतरिनाला बॉडी शेमिंगवरून बोलणाऱ्यांचाही त्याने समाचार घेतला. मात्र, सोफिया हयातच्या नव्या खुलाशाने आणि तिच्या प्रतिक्रियेने सोशल मीडियावर एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. त्याशिवाय, सलमान खान संबंधित जुना मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे.

https://www.prahaar.in/2026/09/20/paithani-a-nath-and-the-dhak-dhak-girls-traditional-marathi-look-the-premiere-date-for-kon-honar-crorepati-has-finally-been-set/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here