प्राची शिरकर
मुंबई : गणेशोत्सव म्हणजे केवळ भव्य देखावे आणि आरास नव्हे, तर ‘श्रद्धेतून संस्कृती आणि संस्कृतीतून सेवा’ हाच खरा विचार आहे, हे अँटॉप हिल येथील ‘मुंबईचा इच्छापूर्ती गणपती मंडळाने’ पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. कोकणच्या मातीत रुजलेली आणि संस्कृतीचा वारसा जपणारी शिमगोत्सवाची पालखी यंदा इच्छापूर्ती मंडळाच्या रूपाने मुंबईत अवतरली आहे. मात्र, ही केवळ परंपरेची पालखी नसून, ग्रामीण भागातील चिमुकल्यांचे भविष्य उजळवणारी ‘देवरूपी ज्ञानाची पालखी’ ठरली आहे.
‘एक साडी, एक सन्मान’ नंतर आता ‘विद्या दानाचा’ ध्यास
https://www.prahaar.in/2026/09/17/lalbaugcha-rajas-prasad-now-served-on-eco-friendly-plates-ditching-plastic-has-prevented-1580-kg-of-carbon-emissions/
सामाजिक बांधिलकी जपणारे मंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इच्छापूर्ती मंडळाने गेल्या वर्षी “एक साडी, एक सन्मान” या उपक्रमाद्वारे ८०० हून अधिक गरजू महिलांना सन्मानित केले होते. याच सेवाभावाची पुढची पायरी म्हणून यंदा मंडळाने ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके, शैक्षणिक साहित्य आणि उज्ज्वल भविष्याची आशा देण्याचा दृढ संकल्प केला आहे.
सजावट म्हणजे देखावा नाही, तर सेवेचा मार्ग
बाप्पाच्या आराधनेची नवी व्याख्या
श्रींचे पूजन केवळ फुले आणि नैवेद्य अर्पण करूनच नाही, तर एखाद्या गरजू आणि होतकू मुलाच्या हातात पुस्तक टेकवूनही करता येते, हा सुंदर संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. कोकणी संस्कृतीची ओळख, परंपरेचा आदर आणि त्याला जोडलेली शिक्षणाची कास यामुळे अँटॉप हिलच्या इच्छापूर्ती मंडळाची ही ‘ज्ञानाची पालखी’ सध्या संपूर्ण मुंबईकरांच्या कौतुकाचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.