मुंबई: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवलं जातं. या शोचे फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये करोडो चाहते आहेत. आपल्या निखळ कॉमेडीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करणाऱ्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील कॉमेडी स्किट्सचं लेखन करणारे लेखक विजय कुमार यांचं निधन झालं आहे. (Television Show)
शोप्रमाणे त्यातील कलाकारांचा आणि पडद्यामागील कलाकारांचा मोठ्या प्रमाणावर चाहतावर्ग आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवण्यामागे जेवढा खारीचा वाटा कलाकारांचा असतो, तितकाचा तो लेखकाचाही असतो. लेखक कशा पद्धतीने विनोदी स्किट प्रेक्षकांसमोर सादर करतो, ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. शोसाठी विनोदी स्किट लिहिणाऱ्या लेखक विजय कुमार यांचं काल रात्री एका अपघातात निधन झालं आहे. शोचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना ही बातमी शेअर केलेली आहे. (Writer Vijay Kumar Accidental Death)
https://www.prahaar.in/2026/09/17/censor-board-reconstituted-18-new-members-included-including-preity-zinta-and-pankaj-tripathi/
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “हास्यजत्रेच्या सृजन टीममधील लेखक विजय कुमार राख यांचे काल रात्री (१६ सप्टेंबर, बुधवार) एका अपघातात निधन झाले आहे. विजय कुमार विनोदाची उत्तम जाण असणारे आणि ग्रामीण जीवनाचे बारकावे हेरणारे मराठवाड्यातील एक होतकरू लेखक होते. ऐन तारुण्यात त्यांचे जाणे हे कलाक्षेत्र, हास्यजत्रा टीम आणि त्यांच्या मित्र परिवारासाठी मोठा धक्का आहे. हास्यजत्रेची टीम त्यांच्या कुटुंबियांच्या वेदनेत सहभागी आहे. विजय कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली…” सचिन गोस्वामी यांनी शेअर केलेल्या पोस्टवर अनेक टिव्ही कलाकारांकडून विजयला श्रद्धांजली वाहिली जात आहे. (Maharashtrachi Hasyajtara)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो सध्या ‘सोनी मराठी’ या चॅनलवर टेलिकास्ट केला जात आहे. ऑगस्ट २०२६ मध्ये या शोला ८ वर्षे पूर्ण झाले. यानिमित्त हास्यजत्रेच्या सेटवर निर्मात्यांकडून आणि दिग्दर्शकांकडून सेलीब्रेशन करण्यात आलं होतं. शोमध्ये परिक्षकांचं काम अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेत्री सई ताम्हणकर करतात. तर सुत्रसंचालिकेचं काम अभिनेत्री प्राजक्ता माळी करते. शोमधील कलाकारांचा जगभरात चाहतावर्ग आहे. शोमधील सर्व कलाकार प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करतात. शोमधील स्किटच्या लिखाणाचं काम सचिन गोस्वामी आणि अरविंद जगताप करतात. यांच्यासोबतच इतरही कलाकार लेखक म्हणून काम करतात. त्यापैकीच एक विजय कुमार हे सुद्धा होते. (Sachin Goswami Post News)
https://www.prahaar.in/2026/09/16/a-400-year-old-mystery-and-secrets-of-the-forest-trailer-of-siddharth-and-tamannaahs-the-one-released/