Home गणेशोत्सव Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा; महाराष्ट्राच्या लोककलेचा देश-विदेशात व्यापक जागर

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा; महाराष्ट्राच्या लोककलेचा देश-विदेशात व्यापक जागर

0
Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा; महाराष्ट्राच्या लोककलेचा देश-विदेशात व्यापक जागर
Ganeshotsav gets state festival status

मुंबई : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राची समृद्ध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा राज्याच्या सीमांपलीकडचे देश-विदेशातील रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ‘लोककलेतील श्रीगणेश’ या उपक्रमांतर्गत राज्यातील ३६ जिल्ह्यांसह देशातील विविध राज्यांत, नवी दिल्लीत आणि दुबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.(Ganeshotsav 2026)

देशातील विविध राज्यांमधील सादरीकरणे

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी देशातील विविध प्रमुख शहरांत खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:

  • देहरादून (उत्तराखंड): १६ सप्टेंबर रोजी इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी येथे पारंपरिक ढोल-ताशा वादन.

  • जम्मू (जम्मू-काश्मीर): १८ सप्टेंबर रोजी पद्मश्री पद्मा सचदेव शासकीय महाविद्यालय सभागृहात लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य आणि गायन.

  • चेन्नई (तमिळनाडू): २० सप्टेंबर रोजी कृष्णा गणा सभा येथे नमन, गण, जाखडी, मंगळागौर, आदिवासी, धनगरी, कोळी नृत्य आणि जागरण-गोंधळ.

  • सिल्वासा (दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव): २१ सप्टेंबर रोजी कला केंद्रात लेझीम, गण-गौळण, बाल्या नृत्य आणि शास्त्रीय नृत्य.

  • लखनऊ (उत्तर प्रदेश): २१ सप्टेंबर रोजी राय उमानाथ बली प्रेक्षागृहात गणेश वंदना, ओवी, मंगळागौर, गोंधळ, भजने आणि संगीतमय नृत्यनाट्य.

  • कोटा (राजस्थान) आणि अमरावती (आंध्र प्रदेश): २२ सप्टेंबर रोजी अनुक्रमे अहिल्याबाई होळकर सभागृह आणि वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पारंपरिक लोककलांचे सादरीकरण.

  • कोलकाता (पश्चिम बंगाल): २२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र निवासातील टिळक हॉलमध्ये स्तवन, गीतरामायण, कोळीगीते आणि देशभक्तीपर गीते.

  • हैदराबाद (तेलंगणा): २३ सप्टेंबर रोजी भारतीय विद्या भवन येथे ‘महा गणेशोत्सव’ अंतर्गत विशेष सांस्कृतिक कार्यक्रम.

https://www.prahaar.in/2026/09/14/jalgaon-crime-news-betrayed-by-the-very-man-she-treated-like-a-son-brutal-murder-of-an-85-year-old-woman/

नवी दिल्लीत कला-संस्कृतीची मेजवानी

राजधानी नवी दिल्लीतही १५ ते २३ सप्टेंबर दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये १५ सप्टेंबर रोजी भरत जाधव यांचा ‘सही रे सही’ नाटक प्रयोग, १७ सप्टेंबर रोजी वैभव जोशी व संदीप खरे यांचा चित्रपट गीतांचा कार्यक्रम, १८ सप्टेंबर रोजी संतोष भांगरे यांचे लोककला सादरीकरण, २० सप्टेंबर रोजी वैशाली सामंत व सहकाऱ्यांचा संगीत कार्यक्रम आणि २३ सप्टेंबर रोजी प्रमिला लोदगेकर यांच्या सादरीकरणातून लावणी परंपरेचा जागर केला जाईल.(Maharashtra Culture)

दुबईत आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकपरंपरेचा प्रसार

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई येथे २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता स्विस इंटरनॅशनल ऑडिटोरियम येथे ‘लोककलेतील श्रीगणेश’ कार्यक्रम होईल. यात नमन, गण, जाखडी, मंगळागौर, कोळी व धनगरी नृत्यांचे सादरीकरण केले जाईल.(Ganeshotsav 2026)

https://www.prahaar.in/2026/09/14/rain-makes-an-appearance-in-mumbai-on-the-very-first-day-of-ganeshotsav-light-to-moderate-rainfall-and-gusty-winds-no-major-alert-issued-for-the-city-by-the-imd/

मुंबईत शास्त्रीय संगीताची सुरेल मेजवानी

राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर प्रथमच मुंबईकरांसाठी १७ ते २४ सप्टेंबर दरम्यान ‘गणेशोत्सव २०२६ शास्त्रीय संगीत महोत्सव’ रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये दररोज सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. यात सुभद्रा देसाई, एस. आकाश, मेहताब अली नियाझी, धनंजय हेगडे यांसह अनेक नामवंत कलाकारांचे गायन व वादन होणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सचिव किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम होत आहेत. या सर्व कार्यक्रमांमध्ये प्रवेश विनामूल्य असून, रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.(Maharashtra Culture)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here