Home ब्रेकिंग न्यूज Mayor’s Residence Ganpati : महापौर निवासस्थानी बाप्पाचे भक्तिभावाने आगमन; पालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या कलेचा विशेष सन्मान

Mayor’s Residence Ganpati : महापौर निवासस्थानी बाप्पाचे भक्तिभावाने आगमन; पालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या कलेचा विशेष सन्मान

0
Mayor’s Residence Ganpati : महापौर निवासस्थानी बाप्पाचे भक्तिभावाने आगमन; पालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या कलेचा विशेष सन्मान
Mayor's Residence Ganpati

मुंबई : श्री गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या शासकीय निवासस्थानी विघ्नहर्त्या गणरायाची अत्यंत मंगलमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. दीड दिवसांच्या या लाडक्या बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.(Mayor’s Residence Ganpati)

पर्यावरणपूरकतेला विशेष प्राधान्य

महापौर निवासस्थानावरील गणेशोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणपूरकतेला दिलेले प्राधान्य आहे. येथे विराजमान झालेली  गणेशाची मूर्ती शाडू मातीची असून, सजावट व आरास देखील विविध फुले आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून साकारण्यात आली आहे.(Mayor’s Residence Ganpati)

https://www.prahaar.in/2026/09/14/evading-police-for-30-years-two-absconding-accused-in-an-atrocity-case-finally-arrested-in-mumbai/

महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या कलेचा सन्मान

या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे प्रभादेवी महानगरपालिका शाळेतील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी रितिक पासवान याने स्वतःच्या हाताने बनवलेली छोटी शाडू मातीची गणेशमूर्ती. मागील आठवड्यात रितिकने ही मूर्ती महापौरांना भेट दिली होती. या बालसुलभ कलेचा आणि भावनेचा सन्मान राखत, महापौरांनी रितिकच्या हाताने घडवलेल्या बाप्पाचीही आपल्या निवासस्थानी प्रतिष्ठापना केली. याप्रसंगी रितिक आणि त्याची आई उपस्थित होते. आपल्या हाताने साकारलेला बाप्पा थेट महापौरांच्या घरी पुजला जात असल्याचे पाहून रितिक व त्याच्या मातेचा आनंद गगनात मावत नव्हता.(Mayor’s Residence Ganpati)

या प्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर रितू तावडे यांनी महाराष्ट्राचा राज्य महोत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. लाडका बाप्पा मुंबई नगरीवर आपली कृपादृष्टी ठेवो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी अन् उत्तम आरोग्यमयी जीवन देवो, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.(Mayor’s Residence Ganpati)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here