Home ब्रेकिंग न्यूज Navnath Ban : ‘अमित शाहांच्या ताफ्यातील गाड्या मोजण्यापेक्षा आपल्या पक्षातील खासदार मोजा’; नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला

Navnath Ban : ‘अमित शाहांच्या ताफ्यातील गाड्या मोजण्यापेक्षा आपल्या पक्षातील खासदार मोजा’; नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला

0
Navnath Ban : ‘अमित शाहांच्या ताफ्यातील गाड्या मोजण्यापेक्षा आपल्या पक्षातील खासदार मोजा’; नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अमित शाहांच्या ताफ्यातील गाड्या मोजण्यापेक्षा आपल्या पक्षातील कार्यकर्ते, आमदार आणि खासदारांची संख्या मोजा, असा टोला शनिवारी भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बन यांनी लगावला. (Navnath Ban)

अमित शाह यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करत बन यांनी कलम ३७० हटविणे, दहशतवादाविरोधातील कारवाई आणि जम्मू-काश्मीरमधील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासह विविध मुद्द्यांचा उल्लेख केला. मोदी सरकारच्या काळात देशाच्या सुरक्षेच्या क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी झाल्याचा दावाही त्यांनी केला. (Navnath Ban)

https://www.prahaar.in/2026/09/12/path-cleared-for-the-recruitment-of-non-teaching-staff-in-aided-secondary-and-higher-secondary-schools/

यावेळी बन यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. राऊत यांनी इतरांवर टीका करण्यापूर्वी आपल्या पक्षाची स्थिती पाहावी, असे ते म्हणाले. तसेच सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांबाबतही त्यांनी राऊतांवर आरोप केले. (Navnath Ban)

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही बन यांनी भाष्य केले. अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या हितासाठी प्रयत्न केल्याचा दावा करत, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात देण्यात आलेले १४ टक्के मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नसल्याची टीका त्यांनी केली. हे आरक्षण टिकवता का आले नाही, याचे उत्तर संजय राऊत यांनी मराठा समाजाला आणि महाराष्ट्राला द्यावे, अशी मागणीही बन यांनी केली. (Navnath Ban)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here