Home ब्रेकिंग न्यूज Amaal Malik : गाण्याला श्रेय न दिल्याने संगीतकार अमाल मलिक संतापला; सलमान खानच्या टीमवर डागली तोफ

Amaal Malik : गाण्याला श्रेय न दिल्याने संगीतकार अमाल मलिक संतापला; सलमान खानच्या टीमवर डागली तोफ

0
Amaal Malik : गाण्याला श्रेय न दिल्याने संगीतकार अमाल मलिक संतापला; सलमान खानच्या टीमवर डागली तोफ
Amaal Malik

मुंबई : २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिरो’ (Hero  Movie) चित्रपटाला वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक पोस्ट शेअर करताना गाण्याचे संगीतकार आणि गीतकाराचे नाव न दिल्याने प्रसिद्ध संगीतकार अमाल मलिक याने ‘सलमान खान फिल्म्स’वर (SKF) जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडिया टीमने गाण्याच्या निर्मात्यांचा असा अनादर केल्याबद्दल अमालने कमेंट सेक्शनमध्ये आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.

“गाण्याचे मूळ निर्माते विसरलात ?” – अमालचा थेट सवाल

‘सलमान खान फिल्म्स’च्या अधिकृत अकाउंटवर कमेंट करत अमालने लिहिले, “जे कोणी हे पेज हाताळत आहेत, त्यांच्या धाडसाचे कौतुक वाटते! एका गाण्याच्या निर्मितीमागे संगीतकार आणि गीतकाराचे रक्त, घाम आणि अपार मेहनत असते. असे असताना मूळ निर्मात्यांना कोणतेही श्रेय न देता, त्यांचा उल्लेखही न करता गाण्याचा उत्सव साजरा करणे अजिबात शोभत नाही.” टीमच्या या निष्काळजीपणावर संताप व्यक्त करत अमालने पुढे लिहिले, “किमान मूलभूत गोष्टी तरी शिकून घ्या, नाहीतर हे पेज बंद करा. माझी ही कमेंट डिलीट करू नका, जेणेकरून सलमान सर स्वतः ही कमेंट पाहू शकतील आणि तुमच्या या मोठ्या चुकीबद्दल त्यांना कळेल.”

https://www.prahaar.in/2026/09/12/bhiwandi-to-host-120-ft-eco-friendly-replica-of-varanasis-swarved-mahamandir-dham/

‘मै हुं हिरो तेरा’ गाण्याची निर्मिती

‘हिरो’ चित्रपटातील गाजलेल्या ‘मै हुं हिरो तेरा’ या गाण्याचे संगीत अमाल मलिकने दिले होते, तर याचे बोल प्रसिद्ध गीतकार कुमार यांनी लिहिले होते. या गाण्याचे मूळ व्हर्जन अमालचा भाऊ अरमान मलिक याने गायले होते, तर सलमान खानने स्वतःच्या आवाजात याचे दुसरे व्हर्जन गाऊन प्रदर्शित केले होते.

संगीतातून तात्पुरता ब्रेक आणि ‘बिग बॉस’चा प्रवास

अमाल मलिकने बॉलीवूडमध्ये ‘जय हो’, ‘रॉय’, ‘कपूर अँड सन्स’, ‘एम. एस. धोनी’, ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ आणि ‘कबीर सिंग’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांना संगीत दिले आहे. ‘मै रहूं या ना रहूं’ यांसारख्या त्याच्या स्वतंत्र गाण्यांनाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच अमालने आरोग्याच्या कारणास्तव आणि विश्रांतीसाठी पुढील वर्षापर्यंत बॉलिवूड संगीतातून तात्पुरता ब्रेक घेत असल्याची घोषणा केली होती. प्रसिद्ध संगीतकार डबू मलिक यांचा मुलगा आणि अनु मलिक यांचा पुतण्या असलेला अमाल मलिक ‘बिग बॉस’ या लोकप्रिय रिॲलिटी शोचा अंतिम फेरीतील (फायनालिस्ट) स्पर्धकही राहिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here