Home ब्रेकिंग न्यूज Irina Rudakova : ‘मुंबईतील हे वर्तन थांबले पाहिजे’; ऑटो चालकाला धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याप्रकरणी बिग बॉस फेम इरिना रुडाकोव्हा आक्रमक  

Irina Rudakova : ‘मुंबईतील हे वर्तन थांबले पाहिजे’; ऑटो चालकाला धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याप्रकरणी बिग बॉस फेम इरिना रुडाकोव्हा आक्रमक  

0
Irina Rudakova : ‘मुंबईतील हे वर्तन थांबले पाहिजे’; ऑटो चालकाला धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याप्रकरणी बिग बॉस फेम इरिना रुडाकोव्हा आक्रमक  
Irina Rudakova

Mumbai : ‘बिग बॉस मराठी ५’ फेम आणि रशियन मॉडेल-अभिनेत्री इरिना रुडाकोव्हा (इरिना राय) हिने मुंबईतील एका रस्त्यावरील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रवासादरम्यान एका कार चालकाने तिच्या ऑटोरिक्षा चालकाला विनाकारण शिवीगाळ करत त्याची कॉलर पकडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे मुंबईतील रस्त्यावरील अरेरावीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

https://www.prahaar.in/2026/09/04/outrageous-incident-in-navi-mumbai-3-year-old-girl-sexually-assaulted-by-school-bus-driver-accused-arrested/

इरिनाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हा संपूर्ण प्रकार स्पष्टपणे दिसून येत आहे. एका कारमधून खाली उतरलेला तरुण व्यक्ती कोणत्याही मोठ्या कारणाशिवाय ऑटोरिक्षा चालकाला अत्यंत अरेरावीत बाहेर खेचताना आणि मारहाण करण्याची भाषा करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, ऑटोरिक्षा चालकाने कोणतीही चूक नसताना आणि गाडीला साधा ओरखडाही लागलेला नसताना तो सतत हात जोडून माफी मागताना दिसत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by IRINA RUDAKOVA (@irina.rai9)

या प्रकारावर संताप व्यक्त करत इरिनाने म्हटले की, “मुंबईतील हे वर्तन अजिबात सहन करण्यासारखे नाही, हे ताबडतोब थांबले पाहिजे.” तसेच, काही लोकांकडे पैसा आणि ताकद आहे म्हणून ते सर्वसामान्य लोकांवर अशी अरेरावी करू शकत नाहीत, असे सांगत तिने कार चालकाच्या मुजोरीचा निषेध केला.

https://www.prahaar.in/2026/09/04/ahilyanagar-police-foiled-a-plot-to-kidnap-a-youth-from-pune-and-take-him-to-uttar-pradesh/

इरिनाने या घटनेचा व्हिडिओ आणि संबंधित कार व ऑटोरिक्षाचे नंबर प्लेट रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. तसेच नागरिकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचे आवाहन करत तिने मुंबई पोलिसांकडे याप्रकरणी कारवाईची आणि मदतीची मागणी केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना आणि कामगारांना अशा प्रकारे नाहक त्रास देणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी आता नेटकऱ्यांकडूनही केली जात आहे.