Navi Mumbai : नवी मुंबईतील कामोठे परिसरातून एक मन सुन्न करणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेच्या खाजगी बस चालकाने अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बसमध्येच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्कूल बसमधील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर ही पीडित चिमुकली शेवटी बसमध्ये एकटीच उरली होती. याच गोष्टीचा गैरफायदा घेत नराधम चालकाने तिच्यावर हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३० वर्षीय चालकाला अटक केली असून पनवेल न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
https://www.prahaar.in/2026/09/04/a-major-signal-from-the-bcci-for-rohit-sharma-but-saikia-clarifies-agarkars-future/
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकली दररोज इतर मुलांसोबत याच खाजगी स्कूल बसने शाळेत ये-जा करत असे. बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपी चालकाने केजी आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना घरी सोडण्यास सुरुवात केली. एकेक करून सर्व मुले आपापल्या थांब्यावर उतरली, मात्र शेवटी ही तीन वर्षांची चिमुकली एकटीच बसमध्ये राहिली. संधी साधत नराधम चालकाने तिच्यावर अत्याचार केला.
https://www.prahaar.in/2026/09/04/the-shadow-of-el-nino-winter-to-vanish-in-india-weather-department-issues-red-alert-for-the-next-six-months-major-crisis-looms-for-agriculture/
चिमुकलीने आजीला सांगितली कहाणी
घरी पोहोचल्यानंतर चिमुकलीला पोटात तीव्र दुखू लागले. तिने रडत आपल्या आजीला “बसच्या ड्रायव्हर काकांनी त्रास दिला,” असे सांगितले. चिमुकलीच्या तोंडून हे ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तात्काळ शाळा प्रशासनाला जाब विचारला आणि पोलिसांत धाव घेतली. मुलीच्या वैद्यकीय तपासणीमध्ये अत्याचाराची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल केला.
https://www.prahaar.in/2026/09/04/major-attack-on-security-forces-in-balochistan-bla-claims-to-have-killed-18-soldiers/
पोलिसांची कठोर कारवाई
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) मधील १२ वर्षांखालील बालकावरील बलात्काराशी संबंधित अत्यंत कठोर कलमे आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. गुरुवारी आरोपीला पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गंभीर प्रकरणात शाळा प्रशासनातील इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात असून त्यांचे जबाब नोंदवले जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप उसळला असून स्कूल बसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.