Home ब्रेकिंग न्यूज Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय; सन २०२९ पर्यंत राज्य नशामुक्त करणार – मुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय; सन २०२९ पर्यंत राज्य नशामुक्त करणार – मुख्यमंत्री फडणवीस

0
Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय; सन २०२९ पर्यंत राज्य नशामुक्त करणार – मुख्यमंत्री फडणवीस
Chief Minister Fadnavis

Mumbai : मुंबई येथील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या विकासाशी आणि जनहिताशी संबंधित चार मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत गृह, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागांतर्गत विविध महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या.

https://www.prahaar.in/2026/09/01/nashik-crackdown-on-sale-of-fake-paithanis/

मंत्रिमंडळातील चार प्रमुख निर्णय:

  • नशामुक्त महाराष्ट्र धोरण: नशामुक्त भारत अभियानांतर्गत सन २०२९ पर्यंत महाराष्ट्रातून अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाने सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन धोरण जाहीर केले आहे. गृह विभागामार्फत ही मोहीम राबवली जाणार आहे.

  • आरोग्यदायी अन्नपदार्थ धोरण: शासकीय आणि निमशासकीय बैठका, कार्यक्रम तसेच उपहारगृहांमध्ये आता आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवणे बंधनकारक करण्यात आले असून, संतुलित मेन्यू असण्याचे नवे धोरण सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्य केले आहे.

  • सोलापूर उन्नत मार्ग प्रकल्प: सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यानचा उन्नत मार्ग प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वरील हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आवश्यक शासकीय जमीन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास (NHAI) हस्तांतरित होणार आहे.

  • कुकडी पाटबंधारे प्रकल्प: पुणे जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या ५,७०४.५० कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली असून, या माध्यमातून १,४४,९१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.

https://www.prahaar.in/2026/09/01/ministers-nitesh-rane-sangram-jagtap-and-mahesh-landge-are-hindu-leaders-who-must-continue-working-for-the-cause-of-hindutva-chief-minister-devendra-fadnavis-lauds-them/

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्रिमंडळाची बैठक आटपून अंतरवालीकडे रवाना झाले आहेत.