कोलंबो : भारत आणि श्रीलंका क्रिकेट इलेव्हन यांच्यातील तीन दिवसीय सराव सामना अपेक्षेपेक्षा अधिक रोमांचक ठरला. भारताला विजयासाठी शेवटच्या षटकात १६ धावांची गरज असताना वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) सलग तीन षटकार ठोकत भारताला ६ विकेट्सने थरारक विजय मिळवून दिला. सिराजच्या या धडाकेबाज फलंदाजीनंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी त्याची बॅट तपासत मजेशीर प्रतिक्रिया दिली. (IND vs SL Practice Match)
अखेरच्या षटकात १६ धावा अन् सिराजचा धुमाकूळ!
श्रीलंका क्रिकेट इलेव्हनने दुसरा डाव २००/६ धावांवर घोषित केला होता. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी २०७ धावांचे लक्ष्य होते. यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी भारताच्या डावाची दमदार सुरुवात करत विजयाची पायाभरणी केली. मात्र, अखेरच्या टप्प्यात सामना चांगलाच रंगला. भारताला शेवटच्या षटकात विजयासाठी १६ धावांची गरज होती. सामना अनिर्णित राहण्याची शक्यता दिसत असतानाच सिराजने (Mohammad Siraj) संपूर्ण चित्रच बदलून टाकले. (IND vs SL Practice Match)
https://prahaar.in/2026/08/08/deep-sorrow-for-lionel-messi-his-father-jorge-messi-passes-away-at-the-age-of-68/
३ चेंडू, ३ षटकार आणि भारताचा विजय!
श्रीलंकेचा गोलंदाज केशरा नुवंथा अखेरचे षटक टाकण्यासाठी आला आणि स्ट्राइकवर होता मोहम्मद सिराज. सिराजने (Mohammad Siraj) पहिल्याच चेंडूवर जबरदस्त षटकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरही त्याने चेंडू थेट सीमारेषेपलीकडे पाठवला. आता भारताला विजयासाठी केवळ चार धावांची गरज होती. तिसऱ्या चेंडूवर सिराजने आणखी एक गगनचुंबी षटकार ठोकत भारताचा विजय निश्चित केला. तीन चेंडू, तीन षटकार आणि सामना भारताच्या खिशात! सिराजने अवघ्या १५ चेंडूंमध्ये नाबाद ३२ धावा केल्या. त्याच्या खेळीत चार षटकारांचा समावेश होता. भारताने २०७ धावांचे लक्ष्य चार विकेट्स गमावून गाठले. (IND vs SL Practice Match)
सिराजची बॅट पाहून श्रीलंकेचे खेळाडूही अवाक्!
सिराजच्या (Mohammad Siraj) या अनपेक्षित फटकेबाजीनंतर मैदानावर एक मजेशीर प्रसंग घडला. सामना संपल्यानंतर खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत असताना श्रीलंकेच्या काही खेळाडूंनी सिराजची बॅट हातात घेतली आणि ती तपासली. वेगवान गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिराजने ज्या पद्धतीने सलग षटकारांची आतषबाजी केली, ते पाहून श्रीलंकेचे खेळाडूही आश्चर्यचकित झाले. सोशल मीडियावरही सिराजच्या या फटकेबाजीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (IND vs SL Practice Match)
DSP GOES 6️⃣ 6️⃣ 6️⃣! 🔥
Mohammed Siraj signs off the warm-up game with three sixes on the trot! 💥 #SonySportsNetwork #SonyLIV #BeautifulGameofTestCricket pic.twitter.com/poApnwLVwu
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 9, 2026
https://prahaar.in/2026/08/07/ajinkya-rahanes-new-innings-no-coaching-or-commentary-after-retirement-now-he-will-take-up-this-major-role/
कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला :
सराव सामन्यातील या विजयामुळे आगामी कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. विशेष म्हणजे, सिराजने गोलंदाजीसोबत फलंदाजीतही संघाला अनपेक्षितपणे महत्त्वपूर्ण योगदान दिले. सराव सामन्यात (Mohammad Siraj) सिराजचा ‘फिनिशर’ अवतार पाहायला मिळाला आणि भारताने श्रीलंका क्रिकेट इलेव्हनवर 6 विकेट्सने विजय मिळवत दौऱ्याची दमदार सुरुवात केली. (IND vs SL Practice Match)