उत्तर २४ परगणा : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना उत्तर २४ परगणा जिल्ह्यात तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. एका मृत तृणमूल (TMC) कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी जात असताना आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला घेरले. या वेळी आंदोलकांनी ‘चोर-चोर’च्या घोषणा देत त्यांच्या गाडीवर चिखल फेकल्याचा आरोप आहे. ही घटना बीजपूर येथे घडली. मृत पक्ष कार्यकर्त्याच्या घरी जात असताना आंदोलकांच्या एका गटाने ममता बॅनर्जी यांच्या वाहनाला घेराव घातला.
https://prahaar.in/2026/08/09/deadline-for-purandar-airport-land-acquisition-extended-to-august-31-compulsory-acquisition-if-consent-letters-are-not-submitted/
माध्यमांशी बोलताना बॅनर्जी म्हणाल्या, “माझ्या गाडीवर दगड, शूज आणि चिखल फेकून हल्ला करण्यात आला आहे. हा पूर्णपणे एक कट आहे. मी येथे येत असल्याची पूर्वकल्पना पोलिसांना दिली होती; तरीही पोलिसांनी सुरक्षेच्या आवश्यक त्या कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत. सध्या संपूर्ण पश्चिम बंगालवर गुंडांचे राज्य सुरू आहे.”
https://prahaar.in/2026/08/09/tight-security-at-the-red-fort-for-the-independence-day-ceremony-15000-to-20000-personnel-deployed-surveillance-via-over-a-thousand-cctv-cameras/
बॅनर्जी या शांतताप्रिय भागात “शांतताभंग करण्यासाठी” आल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून, निदर्शनादरम्यान त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.हलीसहर पोलिसांच्या कोठडीत असताना प्रकृती बिघडल्याने या तृणमूल कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
https://prahaar.in/2026/08/09/no-direct-talks-with-the-us-iranian-foreign-minister-araghchi/
या प्रकरणी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी म्हणाले, “राज्यात कोणी माजी मुख्यमंत्र्यांच्या वाहनावर दगड, चिखल किंवा चप्पल फेकली, तर भाजप त्याचे समर्थन करत नाही. यात भाजपचा कोणताही कार्यकर्ता सामील नाही. राज्याच्या माजी महिला मुख्यमंत्र्यांसोबत असे वर्तन व्हावे, अशी आमची इच्छा नाही. असे घडल्यास भविष्यात पश्चिम बंगालचीच प्रतिमा मलीन होईल. आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि जर अशी घटना घडली असेल, तर पोलीस त्यावर त्वरित कारवाई करतील.”