Home ब्रेकिंग न्यूज Navi Mumbai News : कोपरखैरणे रेल्वे स्थानकावर तरुणीचा छळ; व्हायरल व्हिडिओनंतर 6 तासांत आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Navi Mumbai News : कोपरखैरणे रेल्वे स्थानकावर तरुणीचा छळ; व्हायरल व्हिडिओनंतर 6 तासांत आरोपी पोलिसांच्या ताब्यात

0
Navi Mumbai News : कोपरखैरणे रेल्वे स्थानकावर तरुणीचा छळ; व्हायरल व्हिडिओनंतर 6 तासांत आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नवी मुंबई : कोपरखैरणे रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशांना त्रास देणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई केली. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या 23 वर्षीय तरुणाचा पोलिसांनी अवघ्या 6 तासांत शोध घेत त्याला सानपाडा रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. (Navi Mumbai News)

सुधीर बबलू चहांदे असे या तरुणाचे नाव असून तो सध्या ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर परिसरात पदपथावर राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तो मूळचा वर्धा जिल्ह्यातील पुलफैल येथील आनंद नगरचा रहिवासी आहे. (Koparkhairane railway)

8 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये संबंधित तरुण कोपरखैरणे रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशांना त्रास देताना दिसत होता. हा व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाशी रेल्वे पोलिसांना संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले.

यानंतर पोलिसांच्या पथकाने व्हिडिओतील व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केला. शोधमोहीम राबवत असताना तो सानपाडा रेल्वे स्थानक परिसरात आढळून आला. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले. (Navi Mumbai Police)

चौकशीदरम्यान संबंधित तरुणाला मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर मानसिक आरोग्य सेवा कायद्याच्या कलम 23 अंतर्गत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (Railway Police)

रेल्वे मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वाशी रेल्वे पोलिसांच्या पथकाने तातडीने केलेल्या कारवाईमुळे व्हायरल व्हिडिओतील व्यक्तीचा काही तासांत शोध घेण्यात पोलिसांना यश आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here