– सरंक्षक भिंतीच्या बांधकामाला ४१.८३ कोटी रुपयांचा टेकू
मुंबई (सचिन धानजी) : मलबार हिल (Malabar Hill) येथील के. एन. (कमला नेहरू) उद्यानाजवळील डोंगर उताराच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. डोंगर उतारावर माती आणि खडकांची झीज होऊन दरवर्षी जमिन खचण्याचा धोका निर्माण होत असल्याने उतार स्थिर करण्यासह पायथ्याशी मजबूत सिमेंट-काँक्रीट संरक्षण भिंत उभारण्यात येणार आहे. याठिकाणी निसर्ग उन्नत मार्ग उभारणीचे काम हाती घेतल्यानंतर टेकडीच्या उताराची जागा अधिक मजबूत आणि स्थिर बनवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे याठिकाणी आता संरक्षक भिंतीचा टेकू देत भविष्यात टेकडीची जागा खचणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यामुळे याठिकाणच्या संरक्षक भिंतीच्या टेकूसाठी तब्बल ४२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. (Malabar Hill)
कमला नेहरू उद्यान हे मुंबईतील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून ‘म्हातारीचा बूट’ पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. याच परिसरातील निसर्ग उन्नत मार्गामुळे नागरिकांना डोंगरावरील हिरवाई, पक्षी आणि वन्यजीवांचा अनुभव घेता येतो. मात्र या मार्गाच्या खालील बाजूस काही ठिकाणी तीव्र उतार असून डोंगराच्या पायथ्याशी इमारती, चाळी आणि झोपडपट्ट्या आहेत. त्यामुळे त्यामुळे या टेकडीच्या जमिनीचा भाग खचल्यास झाल्यास मोठी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन संरक्षणात्मक काम हाती घेण्यात येणार आहे. (Malabar Hill)
https://prahaar.in/2026/08/09/bmc-make-digital-payment-facilities-available-at-sion-hospital-directive-from-additional-municipal-commissioner-prajakta-verma-lavangare/
येथील भौगोलिक रचना, मागील-नजिकच्या आणि डोंगर उतारावर कालावधीतील टेकडीवरील जमिन खचण्याच्या झालेल्या घटना आणि महानगरपालिकेव्दारे हाती घेऊन पूर्णत्वास नेलेले प्रकल्प जसे की, प्रमोद नवलकर गॅलरी, निसर्ग उन्नत मार्ग प्रकल्प लक्षात घेऊन सदर प्रकल्पांची सुरक्षितता व डोंगर पायथ्याशी वसलेली निवासी बांधकामे विचारात घेऊन जिवित व वित्त हाणी टाळण्याच्या दृष्टीकोनातून उन्नत मार्ग रेषा, निसर्ग उन्नत मार्गाच्या खालील बाजूस आणि वरील बाजूकडील उर्वरित उतार मजबुतीकरणासाठी स्थिरीकरणाकरिता संरचना व आराखडे तयार करण्यासाठी भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी) मुंबईच्या तज्ञांनी वेळोवेळी सुचविलेल्या सुचना अंतर्भूत केल्या. (Malabar Hill)
या परिसरातील विद्यमान दगडी संरक्षण भिंत अनेक ठिकाणी जीर्ण झाली आहे. दरवर्षीमागील पावसाळ्यात लोयलका कंपाऊंड परिसरात भूस्खलन होऊन संरक्षण भिंत कोसळल्याची घटनाही घडली होती. पोलिस खात्याने मलबार हिल जलाशय टेकडीच्या केलेल्या नियमित सुरक्षा तपासणी दरम्यान मुंबई महापालिकेला सुरक्षेसंबंधी मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. त्यामुळे भविष्यातील धोका टाळण्यासाठी नवीन मजबूत संरक्षण व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Malabar Hill)
https://prahaar.in/2026/08/09/allow-idol-immersion-in-the-sea-this-year-too-brihanmumbai-sarvajanik-ganeshotsav-samanvay-samiti-urges-chief-minister/
कामामध्ये डोंगराला आधार देण्यासाठी विविध तंत्रांचा वापर, मातीला मजबुती देणे, स्टील जाळी बसवणे, गॅबियन व आरसीसी भिंती उभारणे तसेच पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी योग्य निचरा व्यवस्था करण्यात येणार आहे. या कामासाठी देव इंजिनिअर्स या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी ३६.६९ कोटी रुपयांचा मूळ कंत्राट खर्च असून, इतर तरतुदी आणि करांसह एकूण रक्कम ४१.८३ कोटी रुपये होते. या कामाला स्थायी समिती आणि महापालिकेची मंजुरी मिळाल्यानंतर या संरक्षक भिंतीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. (Malabar Hill)