मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण विभागातील कीटकनाशक विभागातील कामगार पांडुरंग तोडकर (वय ४५) यांचा नायगाव बीडीडी चाळीत पाण्याच्या टाकीची पाहणी करताना ५ ते ७ फूट उंचीवरून खाली कोसळून दुर्दैवाने मृत्यू झाला. तोडकर यांच्या मृत्यूमुळे महापालिका कर्मचारी वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नवी दिल्ली : मराठी चित्रपटांनी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशभरात आणि जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि ...

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी न केईएम रुग्णालयात जाऊन तोडकर यांचा मुलगा साईराज आणि कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.याप्रसंगी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक, कीटकनाशक अधिकारी रितेश मारापे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
रायपूर : नक्षलवादाच्या दहशतीमुळे गेली अनेक दशके स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनापासून दूर राहिलेल्या छत्तीसगडमधील बस्तरच्या ९२ गावांत यंदा ...
यावेळी तोडकर कुटुंबाला निवृत्ती वेतनाचे सर्व लाभ आणि त्यांच्या पात्र वारसाला महानगरपालिकेत नोकरी देण्याची कार्यवाही तत्काळ सुरू करण्याचे निर्देश महापौर रितू तावडे आणि आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी प्रशासनाला दिले.






