Home महाराष्ट्र नाशिक Nashik : नाशिकच्या रस्त्यांवरून राजकारण तापलं, राज ठाकरेंना गिरीश महाजनांचे खुले आव्हान

Nashik : नाशिकच्या रस्त्यांवरून राजकारण तापलं, राज ठाकरेंना गिरीश महाजनांचे खुले आव्हान

0
Nashik : नाशिकच्या रस्त्यांवरून राजकारण तापलं, राज ठाकरेंना गिरीश महाजनांचे खुले आव्हान

Nashik : नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नाशिक इतकं सुंदर केलं होतं, तर तुमचा एकही नगरसेवक पुन्हा निवडून का आला नाही ? असा थेट सवाल त्यांनी राज ठाकरे यांना केला आहे.

https://prahaar.in/2026/08/07/devendra-fadnavis-reprimanded-the-chief-official-in-charge-of-the-stone-quarry-in-nashik/

…तर दोन चार नगरसेवक निवडून आले असते

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली. नाशिककरांनी आपलं सरकार पाहिलं. तुमचे महापौर पाहिले. जर खरंच शहराचा इतका विकास झाला असता, तर जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली असती. मात्र एकही नगरसेवक निवडून आला नाही. एवढं सुंदर नाशिक केलं होतं तर लोकांनी असा रिजल्ट का दिला? माझा त्यांना सवाल आहे. त्याचं उत्तर द्या. नाशिकमध्ये काहीही केलं नाही. नुसत्या गप्पा केल्या. सुंदर हरीत काहीही केलं नाही. नाशिक सुंदर केलं तर मग तुमचे दोन चार नगरसेवक निवडून आले असते. कुणालाच निवडून दिलं नाही. यावरून तुम्ही काय केलं हे दिसतं. लोकांना सर्वांना माहीत आहे, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला.

https://prahaar.in/2026/08/07/i-have-no-information-regarding-the-appointment-of-prashant-kishor-as-the-political-advisor-to-the-ncp-state-president-sunil-tatkare/

राज ठाकरेंना गिरीश महाजनांचे खुले आव्हान

दरम्यान, गुजरातच्या कंत्राटदारांना नाशिकची कामे दिल्याचा राज ठाकरे यांनी केलेला आरोपही महाजन यांनी फेटाळून लावला. ‘शहरातील सुरू असलेल्या सर्व कामांच्या कंत्राटदारांची यादी देतो. त्यात एक तरी गुजरातचा किंवा बाहेरच्या राज्यातील कंत्राटदार दाखवावा, असे खुले आव्हान त्यांनी दिले. नाशिकमध्ये सध्या सुमारे दीड हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू असून, त्याचे ठेकेदार सांगावेत. आऊटर रिंगरोड सुरू आहे, त्याचे ठेकेदार त्यांनी सांगावेत. त्याची यादी देतो. त्यातही गुजरातचे कोण ते सांगावे. घाटाची कामे सुरू आहे. सर्व यादी देतो. बाहेर राज्यातील ठेकेदार कोण आहे हे त्यांनी सांगावं. ऑनलाईन टेंडर कोणीही भरू शकतो. तरी सुद्धा बाहेरचे ठेकेदार कोण हे त्यांनी सांगावं, असं आव्हानच महाजन यांनी दिलं

https://prahaar.in/2026/08/07/shalarth-id-scam-major-twist-in-the-160-crore-scam/

यात भ्रष्टाचार कसा असेल ?

भ्रष्टाचाराच्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले. पालिकेची अनेक कामे २० ते २२ टक्के कमी दराने, तर दुरुस्तीची कामे ३० टक्के कमी दराने मंजूर झाली आहेत. फायबर केबलची कामेही ४२ टक्के कमी दराने देण्यात आली आहेत. यात भ्रष्टाचार कसा असेल? आयआयटीसारख्या संस्थेमार्फत कामांचे परीक्षण केले जात आहे. विनाकारण राजकीय आरोप करू नयेत असे महाजन यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here