Home देश Kochi Flight Emergency Door News : कोचीमध्ये विमानाचे इमर्जन्सी डोअर उघडण्याचा प्रयत्न; प्रवाशांमध्ये घबराट, केरळमधील तरुणाला अटक!

Kochi Flight Emergency Door News : कोचीमध्ये विमानाचे इमर्जन्सी डोअर उघडण्याचा प्रयत्न; प्रवाशांमध्ये घबराट, केरळमधील तरुणाला अटक!

0
Kochi Flight Emergency Door News : कोचीमध्ये विमानाचे इमर्जन्सी डोअर उघडण्याचा प्रयत्न; प्रवाशांमध्ये घबराट, केरळमधील तरुणाला अटक!

कोची : मलेशियाची राजधानी कुआलालंपूरहून केरळच्या कोची शहराकडे येणाऱ्या विमानात बुधवारी रात्री एका प्रवाशाच्या खळबळजनक कृत्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. विमान धावपट्टीवर उतरण्यासाठी (लँडिंगसाठी) अवघे काही मिनिटे शिल्लक असताना, एका ३४ वर्षीय तरुणाने विमानाचे इमर्जन्सी एझिट (आपत्कालीन दरवाजा) उघडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, विमानात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी आणि सहप्रवाशांनी त्याला वेळीच रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

लँडिंगच्या वेळी अचानक उडाला गोंधळ

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जमशीर अथाणिकल (वय ३४) असे असून, तो केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील कुट्टनाड येथील रहिवासी आहे. जमशीर हा विमानातील इमर्जन्सी एझिटजवळ असलेल्या खिडकीच्या सीटवर बसला होता. विमान कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असताना, जमशीर अचानक आपल्या जागेवरून उठला. त्याने आधी आपत्कालीन दरवाजाच्या खिडकीवर जोरात हात मारला आणि थेट दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला.

https://prahaar.in/2026/08/07/irctc-japan-tour-package-2026-price-itinerary-booking-details-10-days-trip-from-delhi/

सहप्रवाशांनी दाखवले धैर्य, आरोपीला केले जेरबंद

हा भयानक प्रकार पाहून विमानात एकच घबराट पसरली. जेव्हा केबिन क्रू आणि काही सहप्रवाशांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जमशीरने त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. मात्र, कर्मचाऱ्यांनी आणि प्रवाशांनी एकत्र येत हिंमत दाखवली आणि जमशीरला जागीच पकडून ठेवले. बुधवारी रात्री ११:३० वाजता विमान कोची विमानतळावर सुरक्षितपणे उतरल्यानंतर, बाटिक एअरच्या सुरक्षा पथकाने दिलेल्या तक्रारीनुसार ‘सीआयएसएफ’ (CISF) जवानांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी नेदुमबासेरी पोलिसांच्या स्वाधीन केले.

गुन्हा दाखल; पोलीस तपासाला वेग

या घटनेनंतर नेदुमबासेरी पोलिसांनी आरोपी जमशीरविरुद्ध विमानाचे नुकसान करण्याचा प्रयत्न करणे, प्रवाशांना धमकावणे आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. एनडीटीव्हीला (NDTV) मिळालेल्या एफआयआरच्या माहितीनुसार, त्याच्यावर सध्या गुन्हेगारी धमकी आणि नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप लावण्यात आले आहेत; मात्र यात दहशतवादाशी संबंधित कोणतेही कलम लावण्यात आलेले नाही. त्याने हे कृत्य नक्की कोणत्या कारणासाठी केले, याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here