नवी दिल्ली : भारतातील नेटफ्लिक्सच्या (Netflix) प्रवासाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी (Co-CEO) टेड सारंडोस (Ted Sarandos) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भारताच्या समृद्ध कथाकथन परंपरा, मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राची क्षमता तसेच देशाला ‘ग्लोबल कंटेंट क्रिएशन हब’ बनवण्याच्या संधींवर चर्चा करण्यात आली. (Ted Sarandos Meets PM Modi)
या भेटीनंतर नेटफ्लिक्सने भारतीय सर्जनशील क्षेत्रासाठी मोठी घोषणा करत ‘Netflix India Storytelling Initiative’ या नव्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या माध्यमातून भारतातील नवोदित लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि कंटेंट क्रिएटर्सना जागतिक स्तरावर संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
https://prahaar.in/2026/08/06/370-biryani-controversy-pranit-more-announces-comeback-special-ghayal-similar-to-samay-raina-still-alive/
‘भारताकडे जागतिक कंटेंट निर्मितीची मोठी क्षमता’ : PM मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या भेटीची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केली. त्यांनी म्हटले की, टेड सारंडोस यांची भेट घेऊन आनंद झाला. भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात प्रचंड क्षमता असून, देशाला समृद्ध कथाकथनाची परंपरा आणि उत्कृष्ट सर्जनशील प्रतिभेचा वारसा लाभला आहे. या क्षमतेच्या जोरावर भारताला जागतिक दर्जाचे कंटेंट निर्मिती केंद्र म्हणून आणखी मजबूत करता येईल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. (Ted Sarandos Meets PM Modi)
Netflix India Storytelling Initiative ची सुरुवात :
नेटफ्लिक्स इंडियाने आपल्या १० वर्षांच्या प्रवासाच्या निमित्ताने Netflix India Storytelling Initiative या उपक्रमाची घोषणा केली आहे. हा उपक्रम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NFDC) यांच्या सहकार्याने राबवला जाणार आहे. या माध्यमातून भारतीय मनोरंजन क्षेत्रातील नव्या प्रतिभांना प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि शैक्षणिक भागीदारीच्या माध्यमातून पुढे आणण्यावर भर दिला जाणार आहे. (Ted Sarandos Meets PM Modi)
https://prahaar.in/2026/08/06/major-decision-to-pull-the-movie-deool-band-2-from-theatres-director-pravin-tardes-post-goes-viral/
लेखक, दिग्दर्शक आणि क्रिएटर्सना मिळणार जागतिक व्यासपीठ :
या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारतातील सर्जनशील प्रतिभेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोच मिळवून देणे हा आहे. नवोदित लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि इतर कंटेंट क्रिएटर्सना आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नेटफ्लिक्सने सांगितले की, भारतातील विविध भाषा, संस्कृती आणि कथांना जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची मोठी क्षमता आहे. या उपक्रमामुळे भारतीय कंटेंट इंडस्ट्रीला आणखी मोठे व्यासपीठ मिळण्याची अपेक्षा आहे. (Ted Sarandos Meets PM Modi)
दरम्यान, टेड सारंडोस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे भारताच्या मनोरंजन क्षेत्रातील जागतिक संधींना नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.