मुंबई: आठवड्याच्या अखेरीस आणि आगामी सणासुदीच्या काळात प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबई आणि मडगाव दरम्यान ४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकण प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
https://prahaar.in/2026/08/06/government-on-alert-regarding-the-maratha-caste-certificate-cancellation-issue-action-will-be-taken-if-deliberate-irregularities-are-found-radhakrishna-vikhe-patil/
गाड्यांचे वेळापत्रक आणि फेऱ्या:
-
गाडी क्रमांक ०१०२९ विशेष गाडी: ही गाडी दिनांक १३.०८.२०२६ (गुरुवार) आणि १५.०८.२०२६ (शनिवार) रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (CSMT) येथून रात्री ००.२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५.१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल (एकूण २ सेवा).
-
गाडी क्रमांक ०१०३० विशेष गाडी: ही गाडी दिनांक १३.०८.२०२६ (गुरुवार) आणि १५.०८.२०२६ (शनिवार) रोजी मडगाव येथून दुपारी १६.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल (एकूण २ सेवा).
https://prahaar.in/2026/08/06/370-biryani-controversy-pranit-more-announces-comeback-special-ghayal-similar-to-samay-raina-still-alive/
प्रमुख थांबे:
या विशेष गाड्यांना मार्गात दोन्ही दिशेने दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
https://prahaar.in/2026/08/06/gold-medal-winning-athlete-lashes-out-at-raj-thackeray-expresses-displeasure-after-being-kept-waiting-for-two-and-a-half-hours-without-getting-a-meeting/
गाडीची संरचना (कोच कंपोझिशन):
प्रवाशांच्या सोयीसाठी या ट्रेनमध्ये एकूण २४ डबे असतील, ज्यामध्ये १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी (AC 2 Tier), ५ वातानुकूलित तृतीय श्रेणी (AC 3 Tier), १२ शयनयान (Sleeper), ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय श्रेणी प्रवाशांसह गार्ड्स ब्रेक व्हॅनचा समावेश आहे.
https://prahaar.in/2026/08/06/from-rekha-to-alia-bhatt-these-6-bollywood-beauties-upheld-the-indian-weaving-tradition-on-national-handloom-day/
आरक्षण आणि तिकीट बुकिंग कधीपासून सुरू होणार?
विशेष गाडी क्रमांक ०१०२९ चे आरक्षण दिनांक ०८.०८.२०२६ पासून सर्व प्रादेशिक आरक्षण केंद्रांवर (PRS) आणि आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.irctc.co.in) सुरू होईल. तसेच, सामान्य दरांसह अनारक्षित डब्यांचे बुकिंग ‘युटीएस’ (UTS) प्रणालीद्वारे करता येणार असून, प्रवासी तिकीट बुकिंगसाठी ‘रेलवन’ (RailOne) ॲप देखील डाउनलोड करू शकतात.
गाड्यांच्या थांब्यांसंबंधी सविस्तर वेळ आणि इतर माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा एनटीईएस (NTES) ॲप डाउनलोड करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.