Home ब्रेकिंग न्यूज Ashok Kharat Case : हाताला लकवा तरी…, भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड

Ashok Kharat Case : हाताला लकवा तरी…, भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड

0
Ashok Kharat Case : हाताला लकवा तरी…, भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड

Ashok Kharat Case : समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याने पैशांचा भरणा आणि काढणी करताना दोन हजारांहून अधिक बनावट सह्या केल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे अर्धांगवायूमुळे खरातच्या एका हाताची हालचाल मर्यादित असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट सह्या करण्यात आल्याने पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. या गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर असून त्यात सहभागी आरोपींना कठोर शिक्षेला सामोरे जावे लागू शकते, असेही वाघचौरे यांनी स्पष्ट केले. (Ashok Kharat Case)

https://prahaar.in/2026/08/06/a-sudden-violent-jolt-in-mid-air-sent-passengers-slamming-into-the-ceiling-panic-and-screams-aboard-the-air-india-flight-17-injured/

खरात सध्या राहाता पोलिसांच्या कोठडीत

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने (Ashok Kharat) ५७ व्यक्तींच्या नावावर तब्बल १०० बनावट खाती उघडली होती. या खात्यांमधून जवळपास ६४ कोटी रुपयांचे व्यवहार करण्यात आले. या प्रकरणी पतसंस्थेचा शाखा व्यवस्थापक मिलिंद बनकर याला एसआयटीने अटक केली असून, अशोक खरात सध्या राहाता पोलिसांच्या कोठडीत (Rahata police custody) आहे. (Ashok Kharat Case)

https://prahaar.in/2026/08/06/rohit-sharma-selection-controversy-bcci-vs-selection-committee-over-rohit-sharmas-selection-agarkar-in-a-tight-spot-what-exactly-is-happening-behind-the-scenes/

खरातची आर्थिक देवाणघेवाण अत्यंत सावधपणे

अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे (Additional Superintendent of Police Somnath Waghchaure) यांनीच या बनावट खात्यांचा भांडाफोड केला होता. त्यांच्या तपासात खरातने दोन वर्षांहून अधिक काळ अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आले. संशय येऊ नये म्हणून मोठ्या रकमेऐवजी छोट्या-छोट्या व्यवहारांचा वापर करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकारात शाखा व्यवस्थापकाचीही साथ मिळाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली. अशोक खरात आपल्या घरात किंवा आश्रमात मोठी रक्कम ठेवत नव्हता. पैशांच्या व्यवहाराबाबत तो अत्यंत गोपनीयता पाळत असल्याने आर्थिक देवाण-घेवाणही अत्यंत सावधपणे केली जात होती. (Ashok Kharat Case)

https://prahaar.in/2026/08/06/there-is-no-interference-by-the-state-government-in-the-functioning-of-the-caste-scrutiny-committee/

बावकेच्या चौकशीतून घोटाळ्याचा उलगडा

दरम्यान, जमीन व्यवहारातील फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या अरविंद बावकेच्या चौकशीतूनही या घोटाळ्याचा उलगडा झाला. त्याच्या मोबाईलचे लोकेशन सातत्याने समता पतसंस्थेच्या शाखेजवळ आढळल्याने पोलिसांना संशय आला. त्यानंतर झालेल्या चौकशीत आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे समोर आले असून, बावकेलाही या प्रकरणात आरोपी करण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here