Home देश Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात 100 वर्षे जुने घर कोसळले; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात 100 वर्षे जुने घर कोसळले; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

0
Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात 100 वर्षे जुने घर कोसळले; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात मध्यरात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेत 100 वर्षे जुने घर कोसळून एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

ही घटना प्रतापगडमधील नगर कोतवाली हद्दीतील महुली परिसरात घडली. स्थानिक माहितीनुसार, संबंधित घर अतिशय जुने आणि जर्जर अवस्थेत होते. पावसामुळे घराची रचना कमकुवत झाल्याने मध्यरात्री अचानक घराचा मोठा भाग कोसळला. (Uttar Pradesh News)

https://prahaar.in/2026/08/06/a-narrow-escape-a-major-accident-involving-trumps-marine-one-helicopter-was-averted-alarm-was-raised-as-a-passenger-plane-came-dangerously-close/

घरात एसी फक्त एका खोलीत असल्याने कुटुंबातील सर्व सदस्य त्याच खोलीत झोपले होते. घर कोसळताच सर्वजण ढिगाऱ्याखाली अडकले. मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. त्यानंतर पोलिस आणि बचाव पथकाने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य हाती घेतले. (House Collpase)

सुमारे दोन तासांच्या बचाव मोहिमेनंतर ढिगाऱ्याखालून 7 जणांना बाहेर काढण्यात आले. सर्वांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी 6 जणांना मृत घोषित केले, तर एका जखमी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. (Rescue Operation)

या दुर्घटनेत प्रमोद श्रीवास्तव, रीता श्रीवास्तव, नितीन श्रीवास्तव, माधुरी श्रीवास्तव तसेच माधो आणि अद्विक या दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. एका कुटुंबातील तीन पिढ्यांवर हा काळाने घाला घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

https://prahaar.in/2026/08/05/foreign-journalists-in-pakistan-an-attempt-to-hide-the-truth-about-pok-pakistan-imposes-new-rules-for-foreign-journalists/

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आशुतोष मिश्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाने पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. घर कोसळण्यामागील नेमके कारण शोधले जात असून मुसळधार पावसामुळे घराची भिंत आणि रचना कमकुवत झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. (Uttar Pradesh)

या घटनेनंतर जुन्या आणि धोकादायक इमारतींची तपासणी करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. विशेषतः पावसाळ्यात अशा घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here