Home ब्रेकिंग न्यूज Akola ZP : अकोला शिक्षक बदली प्रकरणात मोठी कारवाई; 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ रोखली

Akola ZP : अकोला शिक्षक बदली प्रकरणात मोठी कारवाई; 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ रोखली

0
Akola ZP : अकोला शिक्षक बदली प्रकरणात मोठी कारवाई; 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ रोखली

अकोला : अकोला (Akola) जिल्हा परिषद शिक्षण विभागातील आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रकरणात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. चौकशीत दोषी आढळलेल्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करत 33 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच 65 शिक्षकांची वेतनवाढ रोखण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांनी यासंदर्भातील आदेश काढले असून, या निर्णयामुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

https://prahaar.in/2026/08/06/tender-for-beautification-work-at-the-mayors-bungalow-and-surrounding-area-cancelled/

आंतरजिल्हा बदली प्रक्रियेदरम्यान सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी करताना अनेक अनियमितता समोर आल्या. चौकशीनुसार, बदलीचा लाभ मिळवण्यासाठी काही शिक्षकांनी बनावट किंवा चुकीची कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. काहींनी दिव्यांग असल्याचे खोटे प्रमाणपत्र जोडल्याचा, तर काही महिला शिक्षकांनी परित्यक्ता किंवा एकल महिला प्रवर्गाचा लाभ मिळवण्यासाठी चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय काही प्रकरणांमध्ये राहत्या पत्त्याबाबतही चुकीची माहिती सादर करण्यात आल्याचे समोर आले.

या संपूर्ण प्रकरणात एकूण 268 शिक्षकांची चौकशी करण्यात आली होती. त्यापैकी 136 शिक्षक नियमबाह्य बदलीप्रकरणी दोषी आढळल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यापूर्वी या प्रकरणात प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यासह 5 अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. (Teacher Transfer Scam)

प्रशासनाच्या माहितीनुसार, ही कारवाई पहिल्या टप्प्यातील असून उर्वरित दोषी आढळलेल्या शिक्षकांवरही लवकरच शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, या प्रकरणाला आता राजकीय रंगही चढू लागला आहे. भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी दोषी शिक्षकांसह या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. यासाठी ते लवकरच पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. (Fake Document)

या प्रकरणामुळे शासकीय बदली प्रक्रियेतील पारदर्शकता, बनावट कागदपत्रांचा वापर आणि प्रशासकीय जबाबदारी याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पुढील काळात या प्रकरणात पोलीस आणि प्रशासन कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Akola ZP)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here