Home ब्रेकिंग न्यूज Vaishali Nagawade : रुपाली चाकणकर यांच्या जागी वैशाली नागवडे

Vaishali Nagawade : रुपाली चाकणकर यांच्या जागी वैशाली नागवडे

0
Vaishali Nagawade : रुपाली चाकणकर यांच्या जागी वैशाली नागवडे

– उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून नियुक्ती; राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षपदी निखिल ठाकरे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची, तर युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बुधवारी या दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र देऊन जबाबदारी सोपवण्यात आली. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून रिक्त असलेल्या या जागेवर अखेर वैशाली नागवडे यांच्या रूपाने नवा चेहरा देण्यात आला आहे. ( Vaishali Nagawade)

पक्षसंघटन अधिक मजबूत करणे आणि आगामी राजकीय आव्हानांचा सामना करण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला होता. गेल्या आठवड्यात ‘देवगिरी’ निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उपस्थित होत्या. या बैठकीत महिला व युवक आघाडीला नवे आणि आक्रमक नेतृत्व देण्यावर एकमत झाले होते. त्यानुसार नागवडे व ठाकरे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. (Rupali Chakankar)

https://prahaar.in/2026/08/04/eknath-shinde-an-elected-representative-is-not-the-master-of-power-but-a-servant-of-the-people-eknath-shinde-shares-his-mantra-of-development-public-service-and-leadership-with/

महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी पुण्यातूनच पक्षाच्या आक्रमक नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यादेखील शर्यतीत होत्या. मात्र पक्षाने ठोंबरे यांना डावलत नागवडे यांच्याकडेच ही धुरा सोपवणे पसंत केले. रुपाली चाकणकर यांच्यानंतर हे महत्त्वाचे पद पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याकडेच गेले आहे. वैशाली नागवडे या सध्या पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून काम पाहत असून त्यांनी यापूर्वी पुणे जिल्हाध्यक्षपद आणि प्रदेश सरचिटणीसपद सांभाळले आहे. दौंड तालुक्यातील सक्रिय व आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख असून २०१७ आणि २०२० च्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. (NCP News)

महिला आयोगाबाबत निर्णय प्रलंबित

दरम्यान, रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादीच्या कोट्यातील या महत्त्वाच्या संवैधानिक पदासाठी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे, डॉ. ज्योती मेटे आणि सुनेत्रा पवार यांच्या निकटवर्तीय वैशाली मोठे यांची नावे शर्यतीत असून, या नियुक्तीचा निर्णय पक्षाच्या पुढील बैठकीत होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here