Home ताज्या घडामोडी Nashik Crime : ‘डायल 112’ वर पोलिसांना फोन, घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनाही बसला मोठा धक्का ! नेमकं काय घडलं ?

Nashik Crime : ‘डायल 112’ वर पोलिसांना फोन, घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनाही बसला मोठा धक्का ! नेमकं काय घडलं ?

0
Nashik Crime : ‘डायल 112’ वर पोलिसांना फोन, घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनाही बसला मोठा धक्का ! नेमकं काय घडलं ?

Nashik Crime News : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी ‘डायल 112’ ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘डायल 112’ च्या मदतीने आतापर्यंत लाखो नागरिकांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून पोलिसांकडून मदत झाली आहे. मात्र याच ‘डायल 112’ चा वापर करून चक्क पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये झाला आहे.

नाशिक शहर पोलीस आयुक्तालय (Nashik City Police Commissionerate) हद्दीतील सातपूर पोलीस ठाण्याच्या (Satpur Police Station) हद्दीत हा खळबळजनक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांत सातपूर नियंत्रण कक्षाला दोन वेगवेगळे ‘फेक कॉल’ (Fake Calls) आल्याने पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. (Nashik Crime News)

https://prahaar.in/2026/08/04/nashik-crime-drunken-youth-attacks-police-on-college-road/

नेमकं काय घडलं ?

2 ऑगस्ट रोजी सकाळी सातपूर नियंत्रण कक्षाला डायल 112 वरून एक कॉल आला. हाणामारीतून एकाची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. बातमी मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळाकडे धाव घेतली, परंतु घटनास्थळी असा कोणताही प्रकार घडला नसल्याने पोलिसांना दिशाभूल झाल्याचे लक्षात आले. सलग दुसऱ्यांदा पोलिसांची दिशाभूल झाल्याचे निष्पन्न झाल्याने सातपूर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. (Nashik Crime News)

https://prahaar.in/2026/08/05/torrential-rains-wreak-havoc-across-the-country-16-people-killed-by-lightning-strikes-in-jharkhand-and-uttar-pradesh/

सलग दुसऱ्यांदा पोलिसांची दिशाभूल

सातपूर परिसरात एकाची हत्या झाली असून एकाच वेळी 5 ते 7 लोक गंभीर जखमी असल्याचा फोन डायल 112 द्वारे नियंत्रण कक्षात यापूर्वीही आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून सातपूर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, तेथे अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे समोर आले. हा कॉल संपूर्णपणे खोडसाळपणातून करण्यात आल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी माहिती देणाऱ्याचा शोध सुरू केला. या घटनेत पोलिसांना एका परप्रांतीय इसमाचा शोध घेण्यात यश आले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. (Nashik Crime News)

https://prahaar.in/2026/08/04/farmers-from-nashik-district-get-the-opportunity-for-study-tours-to-europe-and-china/

‘त्या’ चर्चांवर पोलिसांचा खुलासा

दरम्यान, या फेक कॉलच्या घटनेत पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याशी संबंधित व्यक्तीकडून हे कॉल केले जात असल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगली होती. मात्र, सातपूर पोलिसांनी या चर्चेचे खंडन करत स्पष्टीकरण दिले आहे. सातपूर नियंत्रण कक्षात किंवा बीट मार्शल पथकात कोणतीही महिला पोलीस कर्मचारी कार्यरत नाही. हा संपूर्ण प्रकार निव्वळ खोडसाळपणातून करण्यात आला असून, आपत्कालीन यंत्रणेची दिशाभूल केल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.

मात्र आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळावी या हेतूने ‘डायल 112’ सारख्या सुविधेचा काही खोडसाळवृत्तीच्या नागरिकांकडून प्रयत्न झाल्याने परिसरात आणि पोलीस यंत्रणेतही खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here