Home ब्रेकिंग न्यूज Kolhapur Explosion : कोल्हापुरात बंद घरात भीषण स्फोट; जिलेटिनच्या काड्यांचा वापर झाल्याचा संशय, पोलिसांचा तपास सुरू

Kolhapur Explosion : कोल्हापुरात बंद घरात भीषण स्फोट; जिलेटिनच्या काड्यांचा वापर झाल्याचा संशय, पोलिसांचा तपास सुरू

0
Kolhapur Explosion : कोल्हापुरात बंद घरात भीषण स्फोट; जिलेटिनच्या काड्यांचा वापर झाल्याचा संशय, पोलिसांचा तपास सुरू

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील सुर्वे नगर परिसरात एका बंद घरात झालेल्या भीषण स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी संबंधित घरासह आजूबाजूच्या अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी परिसर सील करून तपास सुरू केला आहे. ( Kolhapur Explosion)

प्राथमिक तपासात हा स्फोट अपघाती नसून मुद्दाम घडवून आणल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. उच्च क्षमतेच्या स्फोटक साहित्याचा वापर करण्यात आल्याचे प्राथमिक निष्कर्ष असून, जिलेटिनच्या काड्यांच्या सहाय्याने घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

https://prahaar.in/2026/08/05/supreme-court-recommends-denying-petrol-and-diesel-to-uninsured-vehicles-key-directives-for-road-safety/

स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, बंद घराच्या भिंती आणि छताला तडे गेले, तर शेजारील अनेक घरांच्या काचा फुटल्या आणि भिंतींचेही नुकसान झाले. मोठा आवाज ऐकून नागरिक घाबरून घराबाहेर आले आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. (House Explosion)

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले असून, स्फोटाच्या ठिकाणाहून नमुने गोळा करून तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. नेमके कोणते स्फोटक आणि किती प्रमाणात वापरण्यात आले, याचा शोध घेतला जात आहे. (Police Investigation)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या घरात स्फोट झाला त्या घरात एक महिला राहत होती. काही महिन्यांपूर्वी तिचे निधन झाल्यानंतर ते घर बंद होते. त्यामुळे बंद घरात स्फोटक साहित्य कसे पोहोचले, स्फोटामागचा उद्देश काय होता आणि घातपाताचा कोणता कट होता का, या सर्व बाबींचा तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here