Home ब्रेकिंग न्यूज Sharad Pawar NCP : शरद पवार गटाकडून सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द

Sharad Pawar NCP : शरद पवार गटाकडून सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द

0
Sharad Pawar NCP : शरद पवार गटाकडून सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने रद्द केल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत आता महेश तपासे आणि माजी आमदार विद्या चव्हाण हे दोनच नेते पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळतील, असे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. (Sharad Pawar NCP)

https://prahaar.in/2026/08/04/minister-gulabrao-patil-submit-the-detailed-report-for-the-vengurla-chipi-water-supply-scheme-based-on-the-tilari-project-within-a-month/

शिंदे यांच्या पत्रानुसार ४ ऑगस्ट २०२६ पासून लागू होणाऱ्या या आदेशाद्वारे सर्व पूर्ववत प्रवक्त्यांच्या नियुक्त्या पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. या कालावधीत पक्षाची अधिकृत भूमिका तपासे आणि चव्हाण हेच मांडतील, त्यामुळे इतर कोणत्याही नेत्यांनी किंवा माजी प्रवक्त्यांनी माध्यमांसमोर वक्तव्ये करू नयेत, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. (Sharad Pawar NCP)

https://prahaar.in/2026/08/04/devendra-fadnavis-300-km-of-new-metro-lines-will-be-operational-in-the-state-by-2030-says-chief-minister-devendra-fadnavis-plans-are-in-place-to-complete-each-project-within-three-years/

राज्यात सध्या विविध राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्क लढवले जात असताना शरद पवार यांच्या पक्षाने अचानक घेतलेला हा निर्णय राजकीय पटलावर चर्चेचा विषय ठरला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडताना कोणताही वाद किंवा असंदिग्धता निर्माण होऊ नये, यासाठी पक्षाने आपल्या संवाद व्यवस्थेची पुनर्रचना केल्याचे दिसते. (Sharad Pawar NCP)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here