Home ब्रेकिंग न्यूज Nitesh Rane : शिवणीबांध मत्स्यबीज केंद्रावर सरकारची सकारात्मक भूमिका; स्थानिकांच्या हिताला प्राधान्य, नितेश राणेंचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

Nitesh Rane : शिवणीबांध मत्स्यबीज केंद्रावर सरकारची सकारात्मक भूमिका; स्थानिकांच्या हिताला प्राधान्य, नितेश राणेंचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

0
Nitesh Rane : शिवणीबांध मत्स्यबीज केंद्रावर सरकारची सकारात्मक भूमिका; स्थानिकांच्या हिताला प्राधान्य, नितेश राणेंचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

मुंबई : भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिवणीबांध येथील शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राच्या (Shivnibandh fish seed center) भवितव्याबाबत राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून, स्थानिक मत्स्यव्यवसायिकांचे हित अबाधित ठेवूनच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी स्पष्ट ग्वाही मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिली. या संदर्भात मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

या बैठकीला आमदार अविनाश ब्राम्हणकर, आमदार परिणय फुके, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन., आयुक्त प्रेरणा देशभ्रतार तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत स्थानिक नागरिक, मत्स्यव्यवसायिक आणि लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या भावना व मागण्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीदरम्यान मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सांगितले की, राज्यातील मत्स्यव्यवसायाचा विकास, स्थानिक मत्स्यव्यवसायिकांचे हित आणि शासकीय मालमत्तेचा प्रभावी व योग्य वापर या तिन्ही बाबींचा समतोल राखणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे शिवणीबांध मत्स्यबीज केंद्रासंदर्भात कोणताही निर्णय घेताना स्थानिक हितसंबंध, मत्स्यबीज उत्पादनाची गरज आणि सर्व संबंधित बाबींचा सखोल अभ्यास करूनच पुढील कार्यवाही केली जाईल. (Nitesh Rane)

https://prahaar.in/2026/08/04/devendra-fadnavis-the-opposition-has-dragged-maharashtras-political-culture-to-rock-bottom/

बैठकीत (Shivnibandh fish seed center) शिवणीबांध मत्स्यबीज केंद्राची स्थापना, त्याची उत्पादन क्षमता, मत्स्यसंवर्धनातील योगदान तसेच केंद्राशी संबंधित विविध तांत्रिक व प्रशासकीय मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. लोकप्रतिनिधींनी सादर केलेल्या निवेदनातील प्रत्येक मुद्द्याचा बारकाईने विचार करण्यात आला.

यावेळी मंत्री राणे (Nitesh Rane) यांनी संबंधित विभागीय अधिकारी, सचिव आणि आयुक्त यांना केंद्रासंदर्भातील सर्व बाबींची वस्तुनिष्ठ तपासणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. स्थानिक मत्स्यव्यवसायिकांच्या हिताला कोणताही धक्का लागणार नाही, मत्स्यबीज उत्पादनावर विपरीत परिणाम होणार नाही आणि शासनाच्या धोरणानुसार पारदर्शक पद्धतीनेच अंतिम निर्णय घेतला जाईल, यावर त्यांनी विशेष भर दिला. (Nitesh Rane)

https://prahaar.in/2026/08/04/why-the-hostility-towards-the-states-first-female-deputy-chief-minister-dhananjay-munde-gives-a-befitting-reply-to-the-oppositions-criticism/

राज्य शासन मत्स्यव्यवसाय क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणी, मत्स्यबीज उत्पादनात वाढ आणि मत्स्यशेतीला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. शिवणीबांधसारख्या महत्त्वाच्या मत्स्यबीज केंद्रांच्या विकासासाठीही शासन सकारात्मक, समन्वयात्मक आणि लोकहिताचा दृष्टिकोन ठेवून काम करत असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले. (Nitesh Rane)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here