Home महाराष्ट्र नाशिक Nashik : दारणा धरणाचा विसर्ग वाढवला; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Nashik : दारणा धरणाचा विसर्ग वाढवला; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

0
Nashik : दारणा धरणाचा विसर्ग वाढवला; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Dam Water

Nashik : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दारणा धरणातून (Darna Dam) होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दारणा धरणातून ९,२८४ क्युसेकने विसर्ग सुरु

नाशिक पाटबंधारे विभागाच्या (Nashik Irrigation Division) पूर नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, आज ३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजल्यापासून दारणा धरणातून होणारा विसर्ग ८,०२० क्युसेकवरून वाढवून ९,२८४ क्युसेक करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढत असून, पुढील काळात आवश्यकतेनुसार विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

https://prahaar.in/2026/08/03/stunt-at-haranbari-dam-proves-fatal-one-dead/

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

त्यामुळे दारणा नदीपात्र आणि नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात ठेवलेले साहित्य, जनावरे किंवा इतर वस्तू तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संबंधित शासकीय विभागांनीही परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here