Home क्रीडा India vs Sri Lanka : जसप्रीत बुमराह श्रीलंका कसोटी मालिकेतून बाहेर; औकिब नबीला पहिल्यांदाच टीम इंडियात संधी

India vs Sri Lanka : जसप्रीत बुमराह श्रीलंका कसोटी मालिकेतून बाहेर; औकिब नबीला पहिल्यांदाच टीम इंडियात संधी

0
India vs Sri Lanka : जसप्रीत बुमराह श्रीलंका कसोटी मालिकेतून बाहेर; औकिब नबीला पहिल्यांदाच टीम इंडियात संधी

नवी दिल्ली: भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेला मुकणार आहे. त्याच्या जागी जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज औकिब नबी याची भारतीय कसोटी संघात पहिल्यांदाच निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याबाबत अधिकृत घोषणा केली आहे . (Jasprit Bumrah)

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान बुमराहच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने वैद्यकीय सल्ल्यानुसार त्याला श्रीलंका दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. (India VS Shri Lanka)

औकिब नबीने गेल्या दोन रणजी ट्रॉफी हंगामात दमदार कामगिरी करत एकूण 104 बळी घेतले आहेत. त्यापैकी 2025-26 हंगामात त्याने 60 विकेट्स घेतल्या होत्या. जम्मू-काश्मीरला रणजी ट्रॉफीतील ऐतिहासिक यश मिळवून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. (Team India)

अलीकडेच औकिब नबी भारत ‘अ’ संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्यात दोन प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने 6 विकेट्स घेत प्रभावी गोलंदाजी केली होती. त्याच्या याच कामगिरीमुळे आता त्याला वरिष्ठ भारतीय संघात पदार्पणाची संधी मिळाली आहे. (Cricket news)

https://prahaar.in/2026/08/03/grand-conclusion-of-the-glasgow-commonwealth-games-india-now-takes-the-baton-for-the-2030-games/

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना 15 ते 19 ऑगस्टदरम्यान गॉल येथे खेळवला जाणार आहे. दुसरा कसोटी सामना 23 ते 27 ऑगस्टदरम्यान कोलंबो येथे होईल. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) 2025-27 चक्राचा महत्त्वाचा भाग मानली जात आहे. (Ranji Trophy)

श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा सुधारित संघ: शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त, साबिक नाईक आणि औकिब नबी. अंतिम संघात फिटनेस चाचणीच्या आधारे आवश्यक बदल होऊ शकतात.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here