Home महाराष्ट्र पालघर Nalasopara News : नागेला तलाव पुन्हा ठरला जीवघेणा! 18 वर्षीय तरुणाचा बळी, सुरक्षेअभावी नागरिक आक्रमक

Nalasopara News : नागेला तलाव पुन्हा ठरला जीवघेणा! 18 वर्षीय तरुणाचा बळी, सुरक्षेअभावी नागरिक आक्रमक

0
Nalasopara News : नागेला तलाव पुन्हा ठरला जीवघेणा! 18 वर्षीय तरुणाचा बळी, सुरक्षेअभावी नागरिक आक्रमक

नालासोपारा : नालासोपारा पूर्व भागातील नागेला तलावात (Nagela Lake) बुडून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गालानगर परिसरालगत असलेल्या या तलावात सोहेल शेख या तरुणाचा बुडून मृत्यू (18-year-old youth drowns) झाला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी वसई-विरार महानगरपालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. (Nalasopara News)

https://prahaar.in/2026/08/02/maharashtra-weather-update-rainfall-intensity-to-increase-in-maharashtra-yellow-alert-for-these-6-districts-warning-issued-for-heavy-rain-accompanied-by-lightning/

वारंवार तक्रारी करूनही सुरक्षा उपाय नाहीत, नागरिकांचा आरोप :

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नागेला तलाव (Nagela Lake) परिसरात यापूर्वीही बुडून मृत्यू होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, वारंवार लेखी तक्रारी करूनही तलावाभोवती संरक्षक कठडे, धोक्याचे इशारा फलक, सीसीटीव्ही कॅमेरे, बचाव साहित्य आणि सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. तलाव परिसरात योग्य सुरक्षाव्यवस्था असती तर अनेक दुर्घटना टाळता आल्या असत्या, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. महानगरपालिकेकडे वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. (Nalasopara News)

https://prahaar.in/2026/08/02/private-detectives-to-come-under-legal-scrutiny-supreme-court-issues-major-directives-to-the-centre/

सुशोभीकरणावर खर्च, पण सुरक्षेकडे दुर्लक्ष?

नागेला तलावाच्या (Nagela Lake) सुशोभीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला. मात्र, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. “तलावाचे सौंदर्यीकरण करण्यापेक्षा नागरिकांच्या जीवित सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे. योग्य नियोजन आणि सुरक्षा व्यवस्था असती तर ही दुर्घटना टाळता आली असती,” असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. (Nalasopara News)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here