– कोणतीही अनधिकृत बांधकामे होणार नाहीत अधिकृत
– महापालिका आयुक्तांचे सर्व सहायक आयुक्तांना कडक निर्देश
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
शाळा, रुग्णालये, रेल्वे, मेट्रो स्थानक, बस स्थानक तसेच बाजारपेठ आदी परिसरातील पदपथांवरील सर्व प्रकारचे अतिक्रमण तात्काळ हटवून पदपथ चालण्यास सुलभ करावेत. अनधिकृत बांधकाम हटवण्यात यावे तसेच अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत अधिकृत करु नयेत, असे स्पष्ट निर्देशच महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी मुख्यालयातील आढावा बैठकीत सर्व सहायक आयुक्तांना दिले आहेत. (BMC News)
रिकामे आणि चांगले पदपथ हे चांगल्या शहराचे वैभव असते. मुंबईतील सुमारे ५० टक्के नागरिक आपला दैनंदिन प्रवास चालत करतात. या पार्श्वभूमीवर, शाळा, रुग्णालये, रेल्वे, मेट्रो स्थानक, बस स्थानक तसेच बाजारपेठांच्या परिसरातील प्रमुख रस्त्यांच्या बाजुच्या पदपथांवरील सर्व प्रकारचे अतिक्रमण हटवून पदपथ तात्काळ रिकामे करण्यावर सर्व सहायक आयुक्त यांनी भर द्यावा. पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमण, चुकीचे रॅम्प तात्काळ निष्कासित करावेत आणि पदपथ नागरिकांसाठी चालणायोग्य बनवावे, अशा सूचना आश्विनी भिडे यांनी दिल्या. पादचाऱ्यांनी पदपथाचा जास्तीत जास्त वापर केल्यास रस्ते वाहतूक उत्तम होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असेही भिडे यांनी यावेळी नमूद केले. (BMC News)
https://prahaar.in/2026/08/01/cctv-surveillance-at-garbage-prone-hotspots-in-mumbai-punitive-action-against-those-dumping-waste/
…असे असले तरी अनधिकृत बांधकामे नियमित होत नाहीत?
जुनी ताबेदारी, मालमत्ता कर भरणे, वीज किंवा दुकान परवाना असला तरी अनधिकृत बांधकामे नियमित होत नाहीत, असे उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामांच्या अनुषंगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईतील अनधिकृत बांधकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. तसेच, अनधिकृत बांधकामे अधिकृत करू नयेत, असेही अश्विनी भिडे यांनी यावेळी सांगितले. (BMC News)
https://prahaar.in/2026/08/01/konkan-railway-good-news-for-the-people-of-konkan-approval-granted-for-a-new-regular-express-train-from-csmt-to-sawantwadi-road-to-serve-passengers-soon/
‘मार्ग’वर प्राप्त खड्ड्यांच्या तक्रारींचे प्राधान्याने निराकरण करा :
मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे झाल्यामुळे खड्ड्यांच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. ‘मार्ग’ अॅपवर १० जून ते ३० जुलै २०२६ या कालावधीत प्राप्त झालेल्या खड्ड्यांच्या एकूण तक्रारींपैकी तब्बल ९६ टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारींचे निवारण होणे ही अतिशय सकारात्मक बाब आहे. यामध्ये सातत्य ठेवून ‘मार्ग’वर प्राप्त खड्ड्यांच्या तक्रारींचे प्राधान्याने निराकरण करावे, अशी सूचना भिडे यांनी दिली. (BMC News)