Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे गिरणा, मोसम आणि आरम नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे चणकापूर, पुनद, हरणबारी आणि केळझर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने संबंधित धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मालेगाव पाटबंधारे विभागाने (Malegaon Irrigation Division) नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
https://prahaar.in/2026/07/31/state-level-committee-established-for-the-rajmata-jijau-womens-empowerment-scheme-new-employment-opportunities-for-womens-self-help-groups/
धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू
मालेगाव पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार,
गिरणा नदी पात्रात –
1. चनकापूर धरण विसर्ग – ८,८६४ क्युसेक.
2. पुनंद धरण विसर्ग – १५,०० क्युसेक.
3. ठेंगोडा बंधारा विसर्ग – १५,२०० क्युसेक.
https://prahaar.in/2026/07/31/dombivli-shaken-16-year-old-girl-subjected-to-gang-rape-after-being-lured-with-promises-of-a-job-and-accommodation-three-arrested-including-the-prime-accused/
मोसम नदी पात्रात –
4. हरणबारी धरण विसर्ग – ११,००० क्युसेक.
आरम नदी पात्रात –
5. केळझर धरण विसर्ग – ३,५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
https://prahaar.in/2026/07/31/jalgaon-rain-update-tapi-river-floods-all-41-gates-of-hatnur-dam-opened/
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुढील ४ ते ५ तास जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमधील विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी नदीपात्रात किंवा पुलांवरून वाहणाऱ्या पाण्यात प्रवेश करू नये, जनावरे व मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे मालेगाव पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.